नवी दिल्ली :हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी असे संबोधले जाते. या एकादशीला भगवान विष्णूची आवळ्याने पूजा केली जाते. आमलकी एकदशी यावर्षी ३ मार्चला येत आहे. यावर्षी आमलकी एकादशीला तीन योग जुळून आले आहेत. त्यामुळे या एकादशीचे महत्व वाढले आहे. त्यामुळे जाणून घ्या कोणत्या पद्धतीने पूजा करावी याबाबतची माहिती.
कधी आहे आमलकी एकादशीचा योग :आमलकी एकदशीला 2 मार्च रोजी सकाळी 6.39 वाजता तिथी सुरू होत आहे. ती तिथी 3 मार्च रोजी सकाळी 9.11 वाजता संपून द्वादशी तिथी सुरू होईल. उदय तिथीमुळे अमलकी एकादशी 3 मार्च रोजी साजरी होणार आहे. एकादशीचे व्रत ३ मार्चच्या रात्री किंवा ४ मार्चला करता येत असल्याची माहिती ज्योतिषाचार्य पंडित शिवकुमार शर्मा यांनी दिली आहे. यावर्षी आमलकी एकादशीला तीन योग जुळून येत आहेत. यात सौभाग्य योग, शोभन योग आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा समावेश आहे.
आमलकी एकादशीची काय आहे अख्यायिका :आमलकी एकादशीला महादेव आणि पार्वती काशीला आल्याची अख्यायिका आहे. महादेव पार्वती काशीला आल्यानंतर त्यांच्यासोबत भक्तांनी फुलांची होळी खेळल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे होळीच्या अगोदर येणाऱ्या आमलकी एकादशीचे महत्व आणखी वाढले आहे. तर दुसरीकडे ब्रह्मदेव भगवान विष्णूच्या नाभीतून अवतरले. यावेळी त्यांनी स्वत:ला जाणून घेण्यासाठी परब्रम्हाची तपस्या केली. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन प्रकटले. यावेळी भगवान विष्णूनी दर्शन दिल्यामुळे बह्माच्या डोळ्यातून अश्रू निघून ते भगवान विष्णूच्या पायावर पडताना त्याचे आवळ्यात रुपांतर झाले. त्यामुळे भगवान विष्णूंनी मला आवळ्याचे फळ प्रिय असल्याचे सांगितले. त्यामुळे मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी आवळ्याची पूजा केल्याची अख्यायिका सांगितली जाते.
आमलकी एकादशीचे व्रत : हिंदू धर्मशास्त्रानुसार द्वादश विधीला एकादशीचे व्रत करणे उत्तम आहे. त्यामुळे आमलकी एकादशीचे व्रत 3 मार्चला पाळसे जाईल अशी माहिती ज्योतिषाचार्य पंडित शिवकुमार शर्मा यांनी दिली. एकादशी वाढली आहे, म्हणजे पहिल्या दिवशी 24 तास एकादशी असते. तर दुसर्या दिवशी तीन मुहूर्तांपर्यंत ती वाढते. त्यामुळे एकादशीचा कालावधी वाढल्याचे दिसून येते. दुसऱ्या एकादशीचे व्रत शैव आणि वैष्णव या दोन्ही संप्रदायांसाठी शुभ असल्याचेही ज्योतिषाचार्य पंडित शिवकुमार शर्मा यांनी सांगितले.