कोलकाता - पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे खासदार असलेले गायक बाबूल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. याची घोषणा त्यांनी शनिवारी केली. आई-वडील, पत्नी, मित्र यांचा सल्ला घेतल्यानंतर मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. बाबूल सुप्रियो यांचा राजकारणातून संन्यास हा भाजपला हा एक मोठा धक्का मानला जातो आहे. फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहित बाबुल सुप्रियो यांनी राजीनामा देत मन मोकळं केलं.
मी आता जातोय, अलविदा. एक महिन्याच्या आत मी आपलं निवासस्थान सोडेल. तसंच खासदारकीचाही राजीनामा देत आहे राजकरणात न राहता देखील सामाजिक कार्य करता येते. समाजसेवा करण्यासाठी राजकरणात असण्याची आवश्यकता नाही. तसेच मी कोणत्याही पक्षात जाणर नाही. टीएमसी, कॉंग्रेस किंवा सीपीएम कोणत्याही पक्षाने बोलावले नाही. मी एकाच टीमचा प्लेयर आहे. तसेच मी एकाच टीमला नेहमी साथ दिली आहे. #MohunBagan (बंगालची फुटबॉल टीम मोहन बगान) आणि राजकारणात फक्त भाजपा. अमित शाह आणि जे. पी. नड्डांकडे राजकारण सोडण्याबाबत बोललो आहे. त्यांनी मला प्रेरणा दिली. याबद्दल त्यांचा आभारी आहे, असं असे बाबुल सुप्रियो यांनी आपल्या लांबलचक फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
2014 आणि 2019 मध्ये मोठे अंतर
जेव्हा मला भाजपाकडून तिकिट मिळाले. तेव्हा मी एकटा होतो. मात्र, आज बंगालमध्ये भाजपा मुख्यविरोधी पक्ष आहे. आज भाजपात अनेक नवे युवा नेता आहेत. तसेच वरिष्ठ नेताही आहेत. त्यांच्या नेतृत्वात पक्ष आणखी वाटचाल करेल, हे अधोरेखीत करायची गरज नाही. तसेच बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य नेतृत्वासोबत मतभेद होते. काही मुद्दे सार्वजनिकरित्या बाहेर आले होते. यास मीही जबाबदार आहे. तसेच अन्य नेतेही जबाबदार आहे. मात्र, आज कोण जबाबदार आहे, हे मला जाणून घ्यायचे नाही. पक्षातील वरिष्ठ नेते मतभेद आणि भांडणांमुळे दुखावले जात आहेत. एखाद्याला समजून घेण्यासाठी 'रॉकेट सायन्स' ज्ञानाची गरज नाही. तसेच आसनसोलच्या नागरिकांचा भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी आभारी आहे.