अल्मोडा (उत्तराखंड): Almora Road Accident : आज, 3 डिसेंबर रोजी सकाळी जिल्ह्याच्या भैंसियाछाना विकास ब्लॉकमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. वरातींची गाडी खड्ड्यात car fell into a ditch पडली. गाडीत वराच्या कुटुंबातील सात जण प्रवास करत होते. या अपघातात वराचे वडील, बहीण, वहिनी आणि पुतण्या यांचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर अल्मोडा बेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर वधू-वरांच्या घरी शोककळा पसरली आहे.
Almora Road Accident : वधूला घेऊन निघालेली वरातीची गाडी दरीत पडली, वराचे वडील, मेहुणी आणि पुतण्याचा मृत्यू
Almora Road Accident : उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात शनिवारी (3 डिसेंबर) सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. इथे लग्नाचा आनंद शोकात बदलला. या अपघातात चार जणांचा मृत्यू car fell into a ditch झाला. सर्व लोक वरातीतून परतत होते, तेव्हा ही घटना घडली. मृतांमध्ये वराचे वडील, बहीण, वहिनी आणि पुतण्या यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, बागेश्वरच्या काफलीगैर भागातील मातेला येथून काल पिथौरागढमधील बेरीनाग येथे लग्नाची मिरवणूक निघाली होती. शनिवारी परतत असताना जामराडीजवळ सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास फोर्ड फिएस्टा कार UK18H 6578 खोल दरीत बिनसार नदीत पडली. हा अपघात एवढा भीषण होता की, कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात वराचे वडील, बहीण, वहिनी आणि पुतण्या यांचा मृत्यू झाला. सर्व मृतांचे पोस्टमॉर्टम सामुदायिक आरोग्य केंद्र धौलचीना येथे केले जाईल.
या अपघाताची माहिती प्रवाशांनी स्थानिकांना दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, प्रशासन आणि एसडीआरएफचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना बाहेर काढले. प्रशासनाचे पथक येण्यापूर्वीच ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केल्याचे तहसीलदार कुलदीप पांडे यांनी सांगितले. जखमींना उपचारासाठी कफलिगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तहसीलदार कुलदीप पांडे यांनी 4 जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.