महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ED Raids in Kashmir: काश्मिरी विद्यार्थ्यांना पाकिस्तानात एमबीबीएसच्या सीट्स दिल्या... जम्मू काश्मिरात फुटीरतावाद्यांवर एनआयएचे छापे - काश्मिरात ३ ठिकाणी ईडीची छापेमारी

अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी हुर्रियत नेते काझी यासिर आणि जम्मू-काश्मीर सॅल्व्हेशन मूव्हमेंटचे अध्यक्ष जफर भट यांच्या निवासस्थानांसह तीन ठिकाणी छापे टाकले. काश्मिरातील विद्यार्थ्यांना पाकिस्तानमध्ये एमबीबीएसच्या जागा वाटप केल्याप्रकरणी हे छापे टाकण्यात आले आहेत.

Allotment of MBBS Seats In Pakistan: ED raids 3 locations in Kashmir
काश्मिरी विद्यार्थ्यांना पाकिस्तानात एमबीबीएसच्या सीट्स दिल्या... जम्मू काश्मिरात फुटीरतावाद्यांवर एनआयएचे छापे

By

Published : Mar 9, 2023, 3:21 PM IST

श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर): काश्मिरी विद्यार्थ्यांना पाकिस्तानमधील एमबीबीएसच्या जागा विकल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी हुर्रियत नेत्यांच्या घरांसह तीन ठिकाणी छापे टाकले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी येथे ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अनंतनागमधील काझी यासिर, येथील बाग-ए-मेहताब भागात 'जम्मू-काश्मीर साल्व्हेशन मूव्हमेंट'चे अध्यक्ष जफर भट आणि अनंतनागच्या मट्टन भागातील मोहम्मद इक्बाल ख्वाजा यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत.

दहशतवादासाठी वापरला पैसा:अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी तीन ठिकाणी छापे टाकले. काश्मिरी विद्यार्थ्यांना पाकिस्तानमध्ये एमबीबीएसच्या 'सीट्स' विकून दहशतवादाला पाठिंबा आणि पैसा पुरवल्याप्रकरणी हा छापा टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जुलै 2020 मध्ये काउंटर इंटेलिजन्स काश्मीरने गुन्हा दाखल केला होता. काही हुरियत नेते आणि शैक्षणिक केंद्रांच्या संगनमताने एमबीबीएसच्या जागा पाकिस्तानमध्ये विकल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर ऑगस्टमध्ये याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली होती. चौकशीत त्यांनी काही लोकांची नावे उघड केली होती.

पाकिस्तानात शिकल्यास भारतात नोकरी नाही:यूजीसीच्या नियमांनुसार पाकिस्तानमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात नोकऱ्या मिळणार नाहीत. या संदर्भात AICTE (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) नेही भारतीय विद्यार्थ्यांनी पाकिस्तानात शिक्षणासाठी जाऊ नये, असा इशारा दिला आहे. तथापि, यूजीसीने असेही म्हटले आहे की, हा नियम पाकिस्तानमधील ज्यांना भारत सरकारने नागरिकत्व दिले आहे त्यांना लागू होणार नाही, असेही म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागांमध्ये ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाकडून छापे टाकण्यात येत आहेत. पाकिस्तानातील लोकांशी मिळून दहशतवादाला खतपाणी घालण्यात येत असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. त्यामुळे ईडीसह विविध सरकारी यंत्रणांकडून जम्मू आणि काश्मिरातील फुटीरतावाद्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत आतापर्यंत अनेक फुटीरतावाद्यांच्या मालमत्ताही जप्त आणि सरकार जमा करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: धर्मपरिवर्तनासाठी थेट नेपाळमधून मिळत होते पैसे, समजलं अन्..

ABOUT THE AUTHOR

...view details