नवी दिल्ली -कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी देशात रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठा करण्यात येणार असल्याचे केंद्रीय रसायन व खत मंत्री सदानंद गौडा यांनी माहिती दिली. हा पुरवठा देशातील राज्यांना १६ मे रोजीपर्यंत करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले आहे.
दर महिन्याला रेमडेसिवीरचे उत्पादन वाढवून १.०३ कोटी करण्यात आले आहे. त्यापूर्वी दर महिन्याला ३८ लाख रेमडेसिवीरचे उत्पादन घेण्यात होते, अशी माहिती केंद्रीय रसायने मंत्री सदानंद गौडा यांनी दिली.
सदानंद गौडा यांनी ट्विट करून रेमडेसिवीरच्या पुरठ्याबाबत माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की प्रत्येक राज्याची गरज लक्षात घेता रेमडेसिवीर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात येणार आहे. तर त्याच्या वाटपाची तरतूद ही १६ मे रोजीपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरात रेमडेसिवीरचा सुरळित पुरवठा होईल, असा त्यांनी विश्वासही व्यक्त केला.
हेही वाचा-कोरोना रुग्णाला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने मागितले तब्बल एक लाख रुपये