महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

G20 Meet Security : G20 दरम्यान 26/11 सारख्या हल्ल्याचा कट उघड, विदेशी पाहुण्यांच्या कार्यक्रमात शेवटच्या क्षणी बदल

जम्मू-काश्मीरमधील G20 टुरिझम वर्किंग ग्रुप परिषदेच्या कार्यक्रमात सुरक्षेच्या कारणास्तव शेवटच्या क्षणी बदल केले गेले आहेत. गुलमर्गमध्ये G20 दरम्यान मुंबईतील 26/11 सारखा हल्ला पुन्हा घडवण्याचा कट दहशतवादी संघटनांनी रचला होता, असे उघड झाले आहे.

G20 Meet Security
g20 बैठक सुरक्षा

By

Published : May 21, 2023, 7:18 PM IST

नवी दिल्ली : 21 मे पासून श्रीनगरमध्ये G20 टूरिजम वर्किंग ग्रुपची बैठक होते आहे. यासाठी श्रीनगरला येणाऱ्या परदेशी प्रतिनिधींच्या प्रवास कार्यक्रमात शेवटच्या क्षणी बदल करण्यात आले आहेत. पाहुणे आता गुलमर्गला जाणार नाहीत. दहशतवादी कटाचा खुलासा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गुलमर्गमध्ये G20 पाहुणे ज्या हॉटेलवर थांबणार होते, त्या हॉटेलवर हल्ला करण्याची योजना आखल्याचा खुलासा दहशतवाद्यांच्या गुप्तचराने केला आहे.

नौदलाच्या कमांडोजकडून सुरक्षा कवायती : श्रीनगरमधील या सभेसाठी कडक सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून श्रीनगरच्या दल सरोवरात नौदलाच्या कमांडोजकडून सुरक्षा कवायती सुरू आहेत. तर विशेष ऑपरेशन ग्रुपचे सदस्य आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे अतिरेकी विरोधी युनिट प्रथमच या नागरी कार्यक्रमाच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

हॉटेलच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतले : सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हॉटेलच्या ड्रायव्हरला अटक केल्यानंतर दहशतवादी मुंबई हल्ल्यासारखा कट रचत असल्याचे उघड झाले आहे. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ओव्हर-ग्राउंड वर्करच्या (OGW) खुलाशानंतर हे बदल करण्यात आले आहेत. यानंतर G20 च्या मैदानाभोवतीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, खोऱ्यातील G20 बैठकीबद्दल अफवा पसरवण्यासाठी कथितरित्या वापरल्या जाणाऱ्या संशयास्पद आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरच्या विरोधात काश्मीर पोलिसांनी सार्वजनिक सूचना जारी केली आहे. OGW असे लोक आहेत जे दहशतवाद्यांना लॉजिस्टिक सहाय्य, रोख, निवारा आणि इतर पायाभूत सुविधांसह मदत करतात, ज्यांच्या मदतीने जम्मू आणि काश्मीरमधील हिज्बुल मुजाहिदीन आणि जैश-ए-मोहम्मद सारखे सशस्त्र गट दहशतवादी चळवळी चालवू शकतात.

मुंबईसारखा हल्ला करण्याचा होता प्रयत्न : सुरक्षा दलांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात फारुख अहमद वानीला अटक केली होती. बारामुल्लामधील हैगाम सोपोरचा रहिवासी असलेला वानी गुलमर्गमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करायचा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो दहशतवादी संघटनांशी ओजीडब्ल्यू म्हणून संबंधित होता आणि सीमेपलीकडील आयएसआय अधिकाऱ्यांच्या थेट संपर्कातही होता. मुंबई हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी ताज हॉटेलवर गोळीबार केला आणि लोकांना ओलीस बनवले, त्याप्रमाणे हॉटेलमध्ये घुसून परदेशी मान्यवरांसह तेथे उपस्थित असलेल्या लोकांना लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश होता, असे चौकशीदरम्यान वानीने उघड केले. सूत्रांनी सांगितले की,काश्मीरमध्ये G20 शिखर परिषदेदरम्यान दहशतवादी एकाच वेळी दोन ते तीन ठिकाणी हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. सध्या संपूर्ण काश्मीरमधील, विशेषत: श्रीनगरमधील सर्व हालचालींवर सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे.

हेही वाचा :

  1. हवाई दलातील लढाऊ मिग-21 विमान नाही दिसणार लढाईच्या रिंगणात, जाणून घ्या कारण
  2. Pakistani Drone Shot: अमृतसरमध्ये अंमली पदार्थ घेऊन जाणारे पाकिस्तानी ड्रोन पाडले; दोन दिवसांत बीएसएफची चौथी कारवाई
  3. Fight During River Rafting : गंगा नदीत राफ्टिंग दरम्यान दोन गटांत तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details