प्रयागराज (अलाहाबाद) -धर्मांतरण करुन विवाह करणाऱ्यांना सुरक्षा प्रदान कताना धर्मांतरण हा महत्त्वाचा मुद्दा नाही. जबरदस्ती धर्मांतरणाचा आरोप नसेल तर अशा प्रेमी युगुलाला सुरक्षा प्रदान करणे, ही पोलीस आणि प्रशासनाची जबाबदारी, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाने म्हटले की, जर दोन बालिक आपल्या इच्छेने लग्न करत असतील, नाही जरी केले असेल आणि सोबत राहत असतील, इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे विवाह प्रमाणपत्र नसले तरी अशा जोडप्याला पोलीस आणि प्रशासनाने सुरक्षा प्रदान करणे त्यांची बांधिलकी आहे. पोलिसांनी अशा जोडप्याला प्रमाणपत्रासाठी जबरदस्ती करू नये, असा आदेश न्यायाधीश सलिल कुमार राय यांनी दिला.
काय आहे प्रकरण?
20 वर्षीय याची हिने धर्मांतरणानंतर 40 वर्षीय व्यक्तीसोबत 11 फेब्रुवारी 2021 या दिवशी विवाह केला. यानंतर तिला तिच्या परिवाराकडून त्रास देण्यात येत आहे, धमकी देण्यात येत आहे, असा आरोप करत तिने न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायालयाने आदेश दिला. अशा प्रकरणांमध्ये कायद्यात स्पष्ट निर्देश आहेत. दोन बालिक महिला आणि पुरुष आपल्या इच्छेने लग्न करू शकतात. मग तो किंवा ती कोणत्याही जाती-धर्माचे असोत, असेही न्यायालयाने म्हटले.