महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

allahabad hc On arya samaj certificate आर्य समाजाचे प्रमाणपत्र विवाह सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय - Arya Samaj Temple

अलाहाबाद उच्च न्यायालयाने Allahabad High Court आर्य समाज मंदिराने Arya Samaj Temple जारी केलेले विवाह प्रमाणपत्र हे लग्न प्रमाणित करण्याचे एकमेव कारण असू शकत नाही allahabad HC decision on arya samaj certificate असे म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की, या प्रमाणपत्राच्या आधारे असे गृहित धरता येणार नाही की, दोन्ही पक्षांमध्ये लग्न झाले आहे.

allahabad hc On arya samaj certificate
allahabad hc On arya samaj certificate

By

Published : Sep 6, 2022, 1:03 PM IST

प्रयागराज : आर्य समाज मंदिराने जारी केलेले विवाह प्रमाणपत्र हे लग्न प्रमाणित करण्याचे एकमेव कारण असू शकत नाही allahabad HC decision on arya samaj certificate असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने Allahabad High Court नोंदवले आहे. ही संस्था लग्न करण्याच्या मान्यतेचा गैरवापर करत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आर्य समाज मंदिराने Arya Samaj Temple दिलेले दाखले या न्यायालयात आहेत. कागदपत्रांची सत्यता विचारात घेतल्याशिवाय, केवळ या प्रमाणपत्राच्या आधारे, असे मानले जाऊ शकत नाही की विवाह दोन्ही पक्षांमध्ये झाला आहे.

भोला सिंगच्या हेबियस कॉर्पसयाचिकेवर, न्यायमूर्ती सौरभ श्याम शमशेरी यांच्या खंडपीठाने सांगितले की, हेबियस कॉर्पस एक विशेषाधिकार प्राप्त रिट आणि एक असाधारण उपाय आहे. तो अधिकार म्हणून जारी केला जाऊ शकत नाही, तो केवळ वाजवी कारणास्तव किंवा शक्यता दर्शविल्यास जारी केला जाऊ शकतो. याचिकाकर्त्याने आपली पत्नी ओलीस असल्याचा आरोप करत हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. दोघांनीही आपल्या मर्जीने लग्न केले आहे. त्यांनी कायदेशीररित्या विवाहित असल्याचे सिद्ध करण्यासाठी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आर्य समाज मंदिर, गाझियाबाद यांनी जारी केलेले प्रमाणपत्र आणि काही छायाचित्रांसह विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले.

खंडपीठाने सांगितले की,विविध आर्य समाज समित्यांनी जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्रांनी न्यायालय भरले आहे, ज्यावर या न्यायालयासमोर तसेच इतर उच्च न्यायालयांसमोरील विविध कार्यवाहीदरम्यान गंभीरपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. सदर संस्थेने कागदपत्रांचा खरा विचार न करता विवाह सोहळा पार पाडण्याच्या विश्वासाचा गैरवापर केला आहे आणि विवाहाची नोंदणी झालेली नसल्यामुळे केवळ त्या प्रमाणपत्राच्या आधारेच पक्षकारांनी विवाह केला आहे असे मानता येणार नाही.

याचिकाकर्त्यांकडे पर्यायी उपाय उपलब्धअसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे ही याचिका स्वीकारता येणार नाही. न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.

हेही वाचाArnia Sector Firing अर्निया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार; भारतीय जवानांकडूनही चोख प्रतिउत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details