हैदराबाद -आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस जगभरात साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज तेलंगाणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात आयोजीत आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस कार्यक्रमाला राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी संबोधीत केले. सर्व राज्यांनी त्यांच्या मातृभाषेला प्राधान्य दिले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी तेलंगाणाचे गृहमंत्री महमूद अली उपस्थित होते.
सर्व राज्यांनी प्रशासकीय कामकाज मातृभाषेत केले पाहिजे. तसेच प्राथमिक शिक्षणही मातृभाषेत घेतलं पाहिजे. तसेच न्यायालयात मातृभाषेत निर्णय सुनावणी झाली. तर ते जास्त चांगल आहे. यातून लोकांना चांगल्या सेवा देण्यास वाव आहे, असे ते म्हणाले. तसेच आपल्या मातृभाषेचे रक्षण आणि जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं.