नवी दिल्ली -राज्य बोर्डाच्या परीक्षा परिस्थितीचे पुन: परीक्षण करून रद्द केल्याची माहिती आंध्र प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने ज्याचा शेवट चांगला होतो, ते सर्व चांगले आहे, (All is well that ends well) अशी टिप्पणी केली. त्यामुळे आंध्र प्रदेशमधील राज्य बोर्डाच्या सर्व परीक्षा रद्द होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आंध्र प्रदेशच्यावतीने वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या पीठापुढे मांडली. गुरुवारीच्या सुनावणीनंतर वकील दवे यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याशी चर्चा केली. त्यांना राज्याचा सर्व परीक्षा रद्द करण्याचा सल्ला मुख्यंमत्र्यांना दिला. दवे यांनी न्यायालयात सांगितले, की जेव्हा संपूर्ण देश निर्णय घेत आहे, तेव्हा आपणही त्याचा विचार करावा. परीक्षा घेऊ नये, असा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे.
हेही वाचा-शिवराळ अभिनेत्री पायल पुन्हा खातेय तुरूंगाची हवा : सुंभ जळेल पण पीळ जात नाही
आंध्र प्रदेशने सर्व परीक्षा रद्द करण्याच्या भूमिकेवर न्यायमूर्ती खानविलकर यांनी निरीक्षण नोंदविले. ते म्हणाले, की राज्य सरकारने घेतलेल्या प्रागतिक भूमिकेचे आम्ही कौतुक करतो. अशा स्थितीत यापूर्वी आंध्र प्रदेशने येण्याची गरज होती.