नवी दिल्ली -भाजपाच्या माजी प्रवक्त्या शर्मा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांच्यावरती असलेले सर्व खटले दिल्लीत हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर नुपूर शर्मा यांच्यावरती देशभरात सर्व दाखल असलेले खटल्यांचा तपास दिल्ली पोलीस करणार ( all firs transfered to delhi against nupur sharma ) आहेत.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत एका टीव्ही शोवेळी नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होते. त्यानंतर नुपूर शर्मांविरोधात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगाना, आसाम, दिल्ली, कर्नाटक या राज्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, अद्यापही याप्रकरणी तपास सुरु आहे, त्यामुळे त्यांना मिळालेला अंतरिम जामीन तसाच राहिल. भविष्यात नुपूर शर्मांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झाला तर, त्याचा तपास दिल्ली पोलीस करणार आहेत. त्याचवेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यासाठी नुपूर शर्मा दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.