नवी दिल्ली - देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे थैमान सुरूच आहे. त्यामुळेच आताही कोरोनाबाबतीत हलगर्जीपणा करता येणार नाही. कोरोनाचा कहर आटोक्यात येत असताना लस नागरिकांना देण्यासाठी जगातील सर्वच देशांचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच लसीकरण वेगाने करण्यासाठी केंद्राकडून पाऊले उचलण्यात येत आहे. लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला असून दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
अन्य आजारांनी ग्रस्त आणि 45 पेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी 1 मार्चपासून लसीकरण - कोरोना लसीकरण लेटेस्ट न्यूज
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात अन्य आजारांनी ग्रस्त असेलेल्या आणि 45 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. हे लसीकरण 10 हजार शासकीय आणि 20 हजार खासगी केंद्रात होणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देताना त्यांनी कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यांविषयी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात अन्य आजारांनी ग्रस्त असेलेल्या आणि 45 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. हे लसीकरण 10 हजार शासकीय आणि 20 हजार खासगी केंद्रात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोरोना लस निशुल्क देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकाच ठिकाणी संपूर्ण 138 कोटी लोकांचे लसीकरण करणे अशक्य असल्याने केंद्राने टप्प्याटप्प्याने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात केली होती. प्राधान्यकृत लसीकरणासाठी सरकारने 2 कोटी फ्रंटलाइन कोरोना योध्यांची निवड केली होती. तिसऱ्या टप्प्यात कोरोनावरील लस ही सामान्यांना मिळणार आहे. लसीकरण अभियान यशस्वी करण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे युद्ध पातळीवर काम करत आहेत.