महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सिद्धू मोसेवाला खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांची कसरत, वाचा या प्रकरणाची खडान खडा माहिती - गायक सिद्धू मुसेवालाची हत्या

पंजाबच्या जवाहरके गावात २९ मे २०२२ रोजी मानसा जिल्ह्यात आठ शार्पशूटराने ( eight sharpshooters fired ) ६० राउंड बेछूट गोळीबार करीत गायक सिद्धू मुसेवालाची ( singer Sidhu Musewala murder ) हत्या केली. पंजाब सरकारने याची गंभीर दाखल घेतलेली असून पंजाब पोलिसांसह दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस ( Maharashtras Pune Rural Police ) हे हत्येचा उलगडा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात दिल्ली पोलिसांना काही प्रमाणात यश मिळाले आहे.

सिद्धू मोसेवाला खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांची कसरत
सिद्धू मोसेवाला खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांची कसरत

By

Published : Jun 13, 2022, 12:35 PM IST

हैदराबाद -पंजाबच्या जवाहरके गावात २९ मे २०२२ रोजी मानसा जिल्ह्यात आठ शार्पशूटराने ( eight sharpshooters fired ) ६० राउंड बेछूट गोळीबार करीत गायक सिद्धू मुसेवालाची ( singer Sidhu Musewala murder ) हत्या केली. पंजाब सरकारने याची गंभीर दाखल घेतलेली असून पंजाब पोलिसांसह दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस ( Maharashtras Pune Rural Police ) हे हत्येचा उलगडा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात दिल्ली पोलिसांना काही प्रमाणात यश मिळाले आहे. तर महाराष्ट्राच्या पुणे ग्रामीण पोलिसांनाही यातील आरोपीला पकडण्यात यश मिळाले आहे. याप्रकरणी संतोष जाधव आणि नवनाथ सुर्यवंशी ( Sharp Shooter Santosh Jadhav Arrested ) यांना काल रात्री गुजरातमधून अटक करण्यात आल्यानंतर एडीजी कुलवंत के सरंगल ( कायदा व सुव्यवस्था ) यांनी आज ( ADG Kulwant Sarangal Pc In Pune ) पत्रकार परिषद घेतली. दोघांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती त्यांनी दिली.

हत्येमध्ये महाराष्ट्रातील शार्प शूटर - पंजाबच्या मानसा जिल्ह्यात आठ शार्प शूटर हत्येसाठी आले असल्याची माहिती आता पुढे येत आहे. यात पंजाबचे ३, राज्यस्थानचे ३ आणि महाराष्ट्राचे दोन शार्पशूटर यांचा समावेश होता. सौरभ महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे ( Saurabh Mahakal alias Siddhesh Kamble ) आणि संतोष जाधव ( Santosh Jadhav ) यांचा त्यात समावेश असून हत्येचा कट हा अनेक महिन्यापासून सुरू होता. तर मुसेवाल याच्या जवळच फॅन बनून वावर आणि रेकी करणाऱ्या केकडा याचा उलगडा झाला आहे. दिल्ली पोलिसांनी केकडाला अटक केलेली आहे. तर दुसरीकडे पुणे ग्रामीण पोलिसांनी सौरभ महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे याला अटक केलेली आहे. त्यामुळे मुसेवाला याच्या हत्येचे ( Musewalas murder case update ) आणखीन सत्य बाहेर पडणार आहे.

संतोष जाधव नेपाळमध्ये? - मुसेवाला याची हत्या करण्यात बिष्णोई गँगचा हात असल्याचे स्पष्ट झालेले आहे. यात मुसेवाला याचा फॅन बनवून रेकी करून खबर देणारा केकडा हा बिष्णोई गँगचा सदस्य आहे. अनेक महिने केकडा हा मुसेवाला यांचा चाहता बनून आसपास वावरत होता. अन त्याच्याच इशाऱ्यानंतर ही हत्या करण्यात आल्याचे समोर आलेले आहे. लॉरेन्स बिष्णोई हा सध्या जोधपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. २० जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडीत आहे. दरम्यान दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्राचे पुणे ग्रामीण पोलिसही बिष्णोईला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र हत्या करणारे सर्व आठ शूटर हे सापडलेले नाहीत. हे आरोपी हत्या करून नेपाळमध्ये दबा धरून बसल्याची माहिती गुन्हेगारी जगतातील सूत्रांच्या आधारे समजत आहे. त्यातच पुण्यात मावळ तालुक्यात मंचर येथे राहणार संतोष जाधव हा बिष्णोई गँगशी संबंधित आहे. तर अटक करण्यात आलेला आरोपी सौरभ महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे हा संतोष जाधव याच्या गँगचा संपर्कातील आहे. संतोष जाधव हा पूर्वीच हत्या आणि मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यात फरार आहे. तो नेपाळमध्ये फरार असल्याचा सूत्राने दावा केला होता.

अरुण गवळी टोळीशी संतोष जाधवचा संबंध नाही - मावळ तालुक्यात अरुण गवळी याचे साम्राज्य आहे. हे जरी वास्तव असले तरीही मंचरमध्ये आदिवासी गावात राहणार संतोष जाधव याचा गवळी गँगशी संबंध नसल्याची माहिती गुन्हेगारी जगतातून सूत्राच्या आधारे मिळत आहे. संतोष जाधव याची स्वतःची गॅंग पुण्यात आणि ग्रामीण भागात आहे. तो बिष्णोई टोळीशी संलग्न झाला. फरारी असल्याने तो टोळीच्या संपर्कात आल्याने आणि त्याचा वावर वॉन्टेड काळात हा राज्यस्थान, हरियाणा आणि पंजाब येथे असल्याचे सूत्राची माहिती आहे. त्यामुळेच या हत्येत त्याचा सहभाग झाला.

संतोष जाधवची बिष्णोई गॅंग सदस्याशी तुरुंगात ओळख - बिष्णोई गँगच्या सदस्यांशी कारागृहात ओळख झाल्यानंतर संतोष जाधव हा बिष्णोई गँगशी संपर्कात आला. त्यानंतर हत्या आणि मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर संतोष जाधव हा फरारी होता. सोबतच सौरभ महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे हा देखील फरार होता. संतोष जाधव हा वॉन्टेड असताना त्याचा वावर हा राज्यस्थान, हरियाणा, पंजाब आदी राज्यामध्ये दिसत होता, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे लॉरेन्स बिष्णोई याच्याशी संतोष जाधव याची भेट झालेली असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे फरारी असलेल्या संतोष जाधव आणि सौरभ महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे यांची मुसेवाला याच्या हत्येसाठी निवड करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. अंडरवर्ल्डच्या सूत्रानुसार मुसेवाल याच्या हत्येनंतर आरोपीनी नेपाळ गाठून आश्रय घेतल्याची चर्चा सुरू आहे.

पंजाब सीमेवरुन ऑटोमॅटिक हत्यार भारतात - मूसेवाला यांच्या सत्तेसाठी वापरण्यात आलेली हत्यारही ऑटोमॅटिक होती. ही भारतात सहजरित्या कुठेही उपलब्ध होतात. पंजाब सीमा परिसरातून ही हत्यारे भारतात येतात आणि त्याचा वापर अशा हत्याकांड यांसाठी गुन्हेगार या टोळ्यांकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी सध्या कारागृहात असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना देखील मुंबईमधून एके ४७ मिळाली होती. तिचा वापर देखील करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

जाधव सूर्यवंशी यांना अटक - संतोष जाधव आणि नवनाथ सुर्यवंशी ( Sharp Shooter Santosh Jadhav Arrested ) यांना काल रात्री गुजरातमधून अटक करण्यात आल्यानंतर एडीजी कुलवंत के सरंगल ( कायदा व सुव्यवस्था ) यांनी आज ( ADG Kulwant Sarangal Pc In Pune ) पत्रकार परिषद घेतली. दोघांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी त्यांचे संबंध आणि पंजाबी गायक सिद्दू मुसेवाला यांच्या हत्येसह पुढील तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले.

शार्प शूटर संतोष जाधव सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी- सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडात पुणे कनेक्शन असल्याचे पुढे आल्यानंतर राज्यात प्रचंड खळबळ उडाली होती. पुण्यातील सौरव महाकाल आणि संतोष जाधव या दोन कुख्यात आरोपीचा सिद्धूच्या हत्याकांडात सहभाग असल्याने पंजाब पोलीस त्यांच्या मागावर होते. दुसरीकडे पुण्यात घडलेल्या हत्याकांडाच्या घटनेतही पुणे ग्राणीण पोलीस सौरव महाकाल आणि संतोष जाधव या दोघांच्या मागावर होते. सिद्धू मुसेवाला हत्याकांडात या दोघांची नावे आल्याने हे पुण्यात सक्रिय असल्याचे उघड झाले. त्यानंतर पुणे पोलिसांनी आधी सौरव महाकालच्या मुसक्या आवळल्यानंतर रात्री संतोष जाधवलाही गुजरातमधून अटक केली.

ABOUT THE AUTHOR

...view details