महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उपनिरीक्षकाच्या गोळीनं जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू , फरार पोलीस अधिकाऱ्यांवर 20 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर

Aligarh Accidental Firing : अलिगडमध्ये उपनिरीक्षकाच्या गोळीनं जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी उपनिरीक्षक फरार असून त्याच्यावर वीस हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय.

woman injured by inspector bullet in aligarh dies during treatment
उपनिरीक्षकाच्या गोळीने जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 10:10 AM IST

उपनिरीक्षकाच्या गोळीने जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

अलिगडAligarh Accidental Firing: काही दिवसांपूर्वी अलिगडमधील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी आलेल्या महिलेला एका पोलीस उपनिरीक्षकाकडून चुकून गोळी लागल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेत गंभीर झालेल्या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. आरोपी पोलीस उपनिरीक्षक सध्या फरार आहे. त्यामुळं आरोपीचा शोध घेण्यासाठी अलिगड पोलिसांनी फरार उपनिरीक्षक मनोज शर्मावर वीस हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. तसंच मनोज शर्माविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आलंय.

8 डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यातील निरीक्षकाच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळीने महिला जखमी झाली होती. पाच दिवसांच्या उपचारानंतर महिलेचा मृत्यू झाला. या दु:खद प्रसंगी संपूर्ण पोलीस पीडितेच्या कुटुंबासोबत उभे आहेत.- कला निधि नैथानी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक

नेमकं काय घडलं :8 डिसेंबर रोजी अलिगड कोतवाली नगर पोलीस स्टेशनमध्ये इशरत निगार (वय 55) या पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्यासाठी आल्या होत्या. पोलिसाच्या टेबलसमोर त्या उभ्या असतानाच पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक मनोज शर्मा यांच्या सरकारी बंदुकीतून अचानक गोळी झाडली गेली. बंदुकीतून सुटलेली ही गोळी महिलेच्या डोक्याजवळ कानाच्यावर लागल्यानं गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्वरित इशरत यांना जवाहरलाल नेहरू वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये मोठा गदारोळ झाला होता. त्याचवेळी मनोज शर्मानं तेथून पळ काढला.

आरोपीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी :उपचाराच्या पाच दिवसांनंतर इशरत निगार यांचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी मनोज शर्माविरुद्ध भादंवि कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आलंय. मनोज शर्मा सध्या फरार असून त्याच्यावर वीस हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलंय. तसंच फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचं एक पथकंही तैनात करण्यात आलंय.

हेही वाचा -

  1. Mobile Blast : धक्कादायक! मोबाईलचा खिशातच झाला स्फोट; कंपनीविरोधात गुन्हा दाखल
  2. Allah Hu Akbar Slogans In AMU : प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात 'अल्ला हू अकबर'चे नारे; अलिगड विद्यापीठातील घटना
  3. Aligarh Rape Case : अलिगडमध्ये वयाच्या 7 व्या वर्षापासून महिलेवर होत होता बलात्कार, 32 वर्षांनंतर FIR दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details