महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अलीगढ : गर्भवती महिलेने मतदान केंद्रावरच दिला बाळाला जन्म - अलीगढ महिला मतदान केंद्र प्रसूती

मतदानासाठी आलेल्या या महिलेला केंद्रावरच प्रसूती वेदना जाणवू लागल्या. त्यामुळे याठिकाणी उपस्थित असणाऱ्या इतर महिलांच्या मदतीने या महिलेची प्रसूती पार पडली. यानंतर तिला आणि बाळाला तातडीने नजीकच्या आरोग्य केंद्रावर नेण्यात आले.

aligarh-pregnant-woman-gives-birth-to-newborn-at-polling-booth
अलीगढ : गर्भवती महिलेने मतदान केंद्रावरच दिला बाळाला जन्म

By

Published : Apr 30, 2021, 7:25 AM IST

लखनऊ :उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये एक गर्भवती महिला मतदानासाठी आली होती. यावेळी तिने मतदान केंद्रावरच बाळाला जन्म दिला. अत्रौली तालुक्यात गुरुवारी ही घटना घडली.

इतर महिलांच्या मदतीने प्रसूती..

मतदानासाठी आलेल्या या महिलेला केंद्रावरच प्रसूती वेदना जाणवू लागल्या. त्यामुळे याठिकाणी उपस्थित असणाऱ्या इतर महिलांच्या मदतीने या महिलेची प्रसूती पार पडली. यानंतर तिला आणि बाळाला तातडीने नजीकच्या आरोग्य केंद्रावर नेण्यात आले.

अलीगढ : गर्भवती महिलेने मतदान केंद्रावरच दिला बाळाला जन्म

जिरौली कम्युनिटी सेंटरच्या डॉ. सुनिता यांनी सांगितले, की एका आशा वर्करने या महिलेला रुग्णवाहिकेतून आरोग्य केंद्रावर आणले. त्यानंतर या नवजात बाळाला पोलिओ आणि हेपॅटिटिसचे डोस देण्यात आले. तसेच या महिलेवरही उपचार करण्यात आले. यानंतर महिलेला हलका आहार देण्यात आला. काही वेळाने तिला घरी सोडण्यात आले.

ही महिला आणि तिचे बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचेही सुनिता यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, या स्थानिक प्रशासनाच्या निवडणुकीमध्ये या महिलेचा दीर उमेदवार होता.

हेही वाचा :दिल्लीमध्ये सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील सहा ठार

ABOUT THE AUTHOR

...view details