मोगादिशू : शहरातील हयात हॉटेलवर अल शबाबच्या सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला al shabaab gunmen attack hotel in mogadishu. यादरम्यान हल्लेखोरांनी दोन कार बॉम्बचा स्फोट केला आणि गोळीबार केला. या हल्ल्यात 12 नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. हयात हॉटेलमधून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल-कायदाशी संबंधित अल-शबाब गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. Gunmen Attack Hotel In Somalia
हयात हॉटेलवरील हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि जिहादी गटाच्या बंदुकधारींमध्ये जोरदार गोळीबार झाला. बंदूकधारी अजूनही इमारतीत लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे. साक्षीदारांनी सांगितले की, अल-शबाबच्या सैनिकांनी शुक्रवारी सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील एका हॉटेलवर गोळीबार आणि स्फोटांनी हल्ला केला. या हल्ल्यात 12 जण ठार झाले.