नवी दिल्ली-अल-कायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरी ( Al Qaeda chief Ayman Al Zawahiri ) याने भारतात सध्या सुरू असलेल्या हिजाबच्या वादावर भूमिका मांडली आहे. त्याने कर्नाटकातील विद्यार्थिनी मुस्कान खानचा उल्लेख केल आहे. मुस्कानने हिजाबचे समर्थन करत ८ फेब्रुवारी रोजी 'अल्लाहू अकबर'चा नारा दिला होता. तर दुसरीकडे उजव्या विचारसरणीच्या जमावाने 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या होत्या.
'हुरत-उल-हिंद' (भारताची नोबल वुमन) शीर्षक असलेले जवाहिरीचे व्हिडिओ भाषण ( Zawahiri video on India and hijab ) जाहीर झाले आहे. अल-कायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरी हा 2020 मध्ये मरण पावला असल्याची समजुत होती. पण, त्याचा व्हिडिओ समोर आल्याने ( Terrorist Zawahiri latest video ) अल जवाहिरी जिवंत असल्याची पुष्टी झाली आहे. भारतामधील मुस्कानने मुस्लिम आणि गैर-मुस्लिम यांच्यातील संघर्षाचे खरे चित्र समोर कसे आणले, याचा जवाहिरीने व्हिडिओमध्ये ( Muskan Khan hijab video ) उल्लेख केला आहे. तसेच जिहादच्या भावनेला आणखी बळ देत मुस्लिमांना जागृत केल्याचे म्हटले आहे. जवाहिरीने अरबी भाषेत बोलत असतानाचा व्हिडिओ इंग्रजी सबटायटल्ससह आहे.
मुस्कानच्या कृतीवर कविता लिहिण्याची प्रेरणा-जवाहिरीच्या 8 मिनिटांच्या 44 सेकंदांच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये, जवाहिरी मुस्कानबद्दल बोलला आहे. अधोगती झालेल्या पाश्चात्य जगाच्या तुलनेत न्यूनगंडाने ग्रासलेल्या मुस्लिम भगिनीने त्यांना व्यावहारिक धडा शिकवल्याबद्दल अल्लाह तिला खूप बक्षीस देईल, असे जवाहिरी व्हिडिओमध्ये म्हणतो. जवाहिरीने भारतीय लोकशाहीवरही टीका केली आहे. मुस्कानच्या कृतीवर कविता लिहिण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगत त्याने कविताही वाचून दाखविली आहे.मी शरणागती पत्करणार नाही, शौर्याने हिजाब घोषित केला. माझ्या विश्वासातून शिका, म्हणून हिजाबचा जप केला, अशा अर्थाची जवाहिरीने कविता वाचून दाखविली आहे.
भारतीय लोकशाहीवर टीका- भारतातील लोकशाहीच्या मृगजळातून फसवणूक करणे थांबवा, असे आवाहन जवाहिरीने केले आहे. भारतीय उपखंडातील लढाई ही जागरुकतेची लढाई आहे. चीनपासून इस्लामिक मगरेबपर्यंत, काकेशस ते सोमालिया, अनेक आघाड्यांवर एकत्रित युद्ध सुरू असल्याचेही जवाहिरीने म्हटले आहे. आपण प्रामाणिक विद्वानांना एकत्र केले पाहिजे. आपले युद्ध वैचारिकपणे लढले पाहिजे. बौद्धिकदृष्ट्या माध्यमांचा वापर करून आणि इस्लामच्या शत्रूंविरुद्ध युद्धभूमीवर शस्त्रे घेऊन लढाई करावी, अशी चिथावणीही त्याने दिली आहे.