महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अक्षय नवमीच्या दिवशी करा दान; तुमच्या जीवनात येईल सुख-समृद्धी - Happiness and prosperity

Akshya Navami : मान्यतेनुसार अक्षय नवमीचं व्रत 3 वर्षे सतत पाळल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. आवळ्याच्या झाडाखाली अन्न खाल्ल्यानं जीवनात सुख-समृद्धी वाढते, असं मानलं जातं.

Akshhay Navami 2023
अक्षय नवमी

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 12:44 PM IST

हैदराबाद : Akshay navami 2023 : हिंदू कॅलेंडरनुसार अक्षय नवमी हा सण कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला साजरा केला जातो. अक्षय नवमीला केलेल्या दान आणि शुभ कार्याचं फळ कायमस्वरूपी राहतात. अक्षय नवमीचं व्रत 3 वर्षे अखंड पाळल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी अख्यायिका आहे. मान्यतेनुसार अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याची पूजा करून त्याच्या झाडाखाली अन्न खाल्ल्यानं जीवनात सुख-समृद्धी वाढते. सत्ययुगाची सुरुवात अक्षय नवमीच्या दिवशी झाली. अक्षय नवमीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. आवळा (गुजबेरीच्या झाडाची) पूजा करण्यासोबतच भगवान विष्णू, माता लक्ष्मीची पूजा करावी आणि भगवान विष्णूच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. आवळ्याच्या झाडाला दूध, पाणी, अक्षत, सिंदूर आणि चंदन अर्पण करावं. त्यानंतर माऊलीला धागा गुंडाळून 11 परिक्रमा करावी.

अक्षय्य नवमीचे महत्त्व आणि दान :मान्यतेनुसार अक्षय नवमीच्या दिवशी स्नान केल्यानंतर दान करावं. या दिवशी आवळा झाडाच्या सावलीत अन्न तयार करून ब्राह्मणाला भोजन दिल्यानंतर कुटुंबासह भोजन करण्याचं विशेष महत्त्व आहे. यासोबतच उबदार लोकरीचे कपडेही दान करावेत. आवळ्याची विधीनुसार पूजा केल्यानंतर भोपळ्याच्या आत सोने, चांदी, पैसा इत्यादी ठेवून ते ब्राह्मणाला दान करण्याचा विशेष महिमा आहे. आवळ्याची पूजा केल्यानं विवाहित महिलांना सौभाग्य प्राप्त होते आणि जोडप्यांना संततीसुखही प्राप्त होते. आवळा नवमी व्रत करणार्‍या व्यक्तीनं शरीर, मन आणि धनाच्या शुद्धतेनं व्रताचे नियम पाळावेत. याशिवाय अक्षय नवमी 2023 च्या दिवशी अनावश्यक उपवास आणि संभाषण टाळून शक्य तितकं देवाचं भजन, कीर्तन करावं, अशी एक रुढ झालेली प्रथा आहे.

आवळा नवमीला आवळा वृक्षाची पूजा का करावी? मान्यतेनुसार आवळा नवमीच्या दिवशी भगवान विष्णू आणि आवळा वृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व असल्याचं हिंदू कॅलेंडरनुसार सांगण्यात आलं आहे. या दिवशी दान इत्यादि केल्यानं केवळ या जन्मातच नाही तर पुढील जन्मातही सत्कर्माचं फळ मिळतं, असा विश्वास आहे. धार्मिक मान्यतेनुसार आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडातून अमृताचे थेंब टपकतात, त्यामुळं या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून अन्न खाण्याची परंपरा आहे. असं केल्यानं आरोग्य चांगलं राहतं. यासोबत अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यानं व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात.

आवळा नवमी 2023 पुजेचा मुहूर्त? 21 नोव्हेंबर रोजी आवळा नवमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 06:48 ते दुपारी 12:07 पर्यंत आहे. या दिवशी तुम्हाला पूजेसाठी 05 तासांपेक्षा जास्त वेळ मिळेल. या दिवसाचा शुभ मुहूर्त किंवा अभिजित मुहूर्त सकाळी 11:46 ते दुपारी 12:28 पर्यंत आहे.

हेही वाचा :

  1. राष्ट्रीय निसर्गोपचार दिन 2023; जाणून घ्या कसे होतात उपचार
  2. प्रतिजैविक जागरूकता सप्ताह का साजरा केला जातो, जाणून घ्या त्या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
  3. आयर्न लेडी इंदिरा गांधी यांची आज जयंती; जाणून घ्या त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी

ABOUT THE AUTHOR

...view details