महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Akshay Kumar tests Covid positive : अक्षय कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; कान्समध्ये होणार नाही सहभागी - अक्षय कुमार कान्स सहभाग

अक्षय कुमारने ट्विटर हँडलवर ( akshay kumar latest news ) म्हटले आहे की, 'मी खरंच कान्स 2022 मध्ये इंडिया पॅव्हेलियनमध्ये आमच्या सिनेमाची वाट पाहत होतो, परंतु दुर्दैवाने कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता आराम करणार आहे. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा. अक्षय कुमारने आपल्या ( Akshay Kumar on tweet on corona ) ट्विटमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि #Cannes2022 यांना टॅग केले आहे.

Akshay Kumar tests Covid positive
अक्षय कुमार

By

Published : May 17, 2022, 9:03 PM IST

मुंबई -कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. हिंदी चित्रपट जगतातील 'खिलाडी' अक्षय कुमार पुन्हा कोरोना व्हायरसच्या विळख्यात आला ( akshay kumar covid positive ) आहे. त्यामुळे 17 मे पासून सुरू होणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये अक्षय कुमारला सहभागी होता येणार ( akshay kumar to skip cannes ) नाही. ट्विटर हँडलवर पोस्ट करून त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.

अक्षय कुमारने ट्विटर हँडलवर ( akshay kumar latest news ) म्हटले आहे की, 'मी खरंच कान्स 2022 मध्ये इंडिया पॅव्हेलियनमध्ये आमच्या सिनेमाची वाट पाहत होतो, परंतु दुर्दैवाने कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता आराम करणार आहे. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा. अक्षय कुमारने आपल्या ( Akshay Kumar on tweet on corona ) ट्विटमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि #Cannes2022 यांना टॅग केले आहे. कान्स 2022 च्या रेड कार्पेटवर अक्षय कुमार संगीतकार ए.आर रहमान, अभिनेते आर. माधवन, नवाजुद्दीन सिद्दीकी, नयनतारा, तमन्ना भाटिया, पूजा हेगडे, चित्रपट निर्माते शेखर कपूर, सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशी आणि दोन वेळा ग्रॅमी विजेते रिकी केज इतर कलाकारांमध्ये सामील होणार होते.

या अभिनेत्यांना कोरोनाची लागण-अभिनेता आमिर खानला कोरोनाची बाधा झाली. त्यावेळी ते घरी क्वारंटाईनमध्ये होते. याशिवाय अभिनेता आर माधवनलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. कोविड 19 ची लागण झालेली अभिनेत्री आलिया भट्टने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती दिली. याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ कोविड 19 पॉझिटिव्ह झाली होती. अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर ही माहिती दिली आहे. कोरोना पॉझिटिव्ह कलाकारांच्या यादीत अभिनेता अर्जुन रामपालचाही समावेश आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details