बुलंदशहर (उत्तरप्रदेश) - निवडणुक प्रचारादरम्यान विरोधकांचा एकमेकांसमोर सामना झाला तर नारेबाजी, हुल्लडबाजी आणि कदाचित मारहाणीचेही प्रकार घडल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. अशावेळी उत्साहपूर्ण वातावरण बघायला मिळणे अपवादच. परंतु उत्तरप्रदेशातील बुलंदशहराने कौतुकास्पद राजकीय उदाहरण घालून दिले आहे आणि त्याला निमित्त ठरली अखिल यादव आणि प्रियंका गांधी यांची प्रचार रॅली...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 10 तारखेपासून सुरू होत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुमधडाका लावला आहे. बुलंदशहर मध्ये काल (गुरूवार) समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची प्रचार रॅली होती. प्रियंका गांधी एका गाडीवरून नागरिकांना अभिवादन करत होत्या. त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्तेही होते. दरम्यान समोरून अखिलेश यादव यांच्यासह त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी आली. अखिलेश यांच्यासोबत जयंत चौधरी देखील होते. दोन्ही पक्षांची प्रचार रॅली एकमेकांसमोर आल्याने कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरूवात केली. प्रियंका यांनी हात दाखवत अखिलेश यांना अभिवादन केले, तर बसमध्ये असलेल्या अखिलेश आणि जयंत चौधरी यांनी देखील अभिवादन केले. त्यानंतर अखिलेश यांनी बसवर चढून प्रियंका गांधींना दाद दिली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. तर कार्यकर्त्यांनी हात हलवत घोषणाबाजी करून आनंद व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अखिलेश-प्रियंकाचे ट्विट -