अमृतसर (पंजाब) -श्री अकाल तख्त साहिबचे जथेदार ग्यानी हरप्रित सिंह यांनी बुधवारी सुवर्ण मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री हरमंदिर साहिबच्या आत हार्मोनियम वापरण्याविरोधात आदेश दिले. आदेशानुसार, श्री हरमंदिर साहिब येथे हार्मोनियमचा वापर हळूहळू बंद केला जाईल, परंतु लगेचच नाही, जेणेकरून तेथे येणाऱ्या भाविकांना त्याची सवय होईल.
हेही वाचा -एलिमिनेटरमध्ये लखनऊ बाहेर, आरसीबीकडून 14 धावांनी पराभव
गुरुद्वारामध्ये कीर्तनादरम्यान हार्मोनियमऐवजी पारंपारिक वाद्यांचा वापर केला जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. हार्मोनियम हे गुरू साहिबांनी वापरलेले वाद्य नाही. खरे तर ते इंग्रजांनी भारताला दिलेले वाद्य आहे. ब्रिटीश राजवटीत ते भारतात आणले गेले होते, असा या निर्णयामागील तर्क ग्यानी हरप्रित सिंग यांनी दिला.
या निर्णयाला एसजीपीसीचे (SGPC) अध्यक्ष एचएस धामी यांनीही सहमती दर्शवली, तर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीनेही या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. असे मानले जाते की, हार्मोनियमचा वापर सर्वप्रथम श्री हरमंदिर साहिबमध्ये 1901 साली करण्यात आला होता. आता 122 वर्षांनंतर त्याचा वापर थांबवण्याचा आदेश देण्यात आला असून,येत्या तीन वर्षांत त्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे.
हेही वाचा -चेन्नईच्या बंदरावर क्रूझ जहाजाची सेवा होणार सुरु.. मुख्यमंत्री स्टॅलिन करणार उद्घटन