महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

AK47 Rifle : AK-47 जगभरातील सैनिकांना का आवडते? वाचा सविस्तर - AK47 rifle

एके 47 हे जगातील सर्वात घातक शस्त्रांपैकी एक मानलं जातं. या शस्त्राचा शोध कसा लागला. हे शस्त्र कोणी तयार केलं? एके 47 चं वैशिष्ट्य काय आहे? हे आज आपण सेना पदक विजेते मेजर भरत सिंगीरेड्डी (निवृत्त) यांच्या विशेष लेखात जाणून घेऊया.

AK47 Rifle
AK47 Rifle

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 10:57 PM IST

हैदराबाद :जागतिक स्तरावर सर्वात लोकप्रिय रायफल म्हणजे एके 47 बद्दल माझं प्रेम अतुट आहे. आर्मर्ड कॉर्प्स, नंतर नॅशनल सिक्युरिटी गार्ड, इंडियन स्पेशल फोर्समध्ये सेवा करण्याची संधी मिळाल्यानं मला सर्व प्रकारची शस्त्रे हाताळण्याची संधी मिळाली. नॅशनल सिक्युरिटी गार्डमध्ये असताना, मला हेकलर अँड कोच MP5 बद्दल आकर्षण वाटलं. जे शहरी वातावरणास अनुकूल असलेलं शस्त्र होतं. मात्र, एके 47 नं खरोखरच माझ्या हृदयाचाच ठाव घेतला. मला एके 47 काश्मीर खोऱ्यात बराच काळ वापरण्याची संधी मिळाली. हे फक्त मीच नाही, माझे सर्व स्पेशल फोर्सचे सहकारी देखील माझं एके 47 बद्दलचं प्रेम सांगतात. जगभरातील दहशतवादी तसंच सैन्यालाही हे शस्त्र आवडतं.

कलाश्निकोव्हनं केली एके 47 तयार :मिखाईल कलाश्निकोव्ह या रशियन सैनिकानं एके 47 ची निर्मिती केली. यामागील एक प्रमुख कारण म्हणजे तत्कालीन रशियन शस्त्रास्त्रांनिशी लढताना त्यांची निराशा झाली होती. मिखाईल कलाश्निकोव्हनं ट्रॅक्टर बनवणाऱ्या मेकॅनिक शेडमध्ये आपल्या जीवनाची सुरू केली. नंतर तो रेड आर्मीमध्ये टँक कमांडर झाला. तो जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये पडला होता. त्याला अविश्वसनीय रशियन रायफल्सच्या कथा ऐकल्या, तेव्हा त्यानं एक नविन शस्त्र तयार करण्याचा प्रयत्न केला.

एके 47 चं वैशिष्ट्ये काय :खरं तर, त्या वेळी रशियन सैन्यानं एक कार्यक्रम चालवला होता. ज्या अंतर्गत त्यांनी तरुण शोधकांना त्यांच्या चांगल्या शस्त्रांसाठी योजना सादर करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. मिखाईल कलाश्निकोव्ह 1947 मध्ये त्याचं डिझाइन घेऊन आला होता. 1949 पर्यंत त्याची रचना रशियन सशस्त्र दलांसाठी इश्यू असॉल्ट रायफल म्हणून स्वीकारली गेली. अशा परिस्थितीत, एके 47 चं वैशिष्ट्ये काय? जी बहुतेक सैनिकांसाठी इतकी लोकप्रिय आहे? सांख्यिकीयदृष्ट्या, ही 106 देशांमध्ये (अधिकृतपणे 55) निवडीचं शस्त्र आहे. जगभरात अंदाजे 100 दशलक्ष लोक त्याचा वापर करत आहेत. एके 47 ची व्याख्या करण्यासाठी तीन शब्द पुरेसे आहेत. मजबूत, विश्वासार्ह, अतुलनीय. या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे ते थोडं विस्तारानं पाहू.

वापरण्यास सोपी : एके 47 वापरण्यास अगदी सोपी आहे. यात कोणतीही गुंतागुंतीची साधनं किंवा भाग वापरत नाहीत. यामुळंच सैनिक स्वत: एके 47 ला सहज स्वच्छ करून दुरुस्त करू शकतात. हे सेफ मोडमधून फायर मोडवर जातं. किंवा अगदी ऑटो मोडमध्ये जातं. ज्यात मोठ्या प्रमाणात लिव्हर चालवता येतं जे सर्व हवामानात ऑपरेट केलं जाऊ शकतं. याच्या मदतीनं शत्रूला 400 मीटर अंतरापर्यंत लक्ष्य करता येतं.

कोणत्याही वातावरणात वापरण्यास सक्षम : या रायफलमधून 100 किंवा 400 मीटर अंतरावरील टार्गेटला लक्ष्य केलं जाऊ शकतं. एके 47 रायफलचा वापर कोणत्याही वातावरणात करता येतो. बर्फ, वाळवंंट, पावसाचा या रायफलवर कोणताही परिणाम होत नाही. ही रायफल चालवण्यासाठी कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची गरज नसते. खेड्यातील सर्वसामान्य माणूसही ते सहज चालवू शकतो. हे UBGL (अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर) सारख्या अतिरिक्त फिटमेंटसह वापरलं जाऊ शकतं.

टिकाऊपणा : एके 47 बनवण्यासाठी कोणत्याही धातूचा वापर केला गेला, असला तरी तो चमत्कारापेक्षा कमी नाही. बॅरलची शेल्फ लाइफ कधीही संपत नाही. या रायफलला जास्त स्वच्छ करण्याची गरज भासत नाही. तर M4 ला भरपूर साफसफाईची आवश्यकता असते. एके 47 कधीही फेल होत नाही. चेंबरमध्ये अडकलेली एक राउंड देखील, पुढील फेरीत गोळीबार करण्यास बाधा ठरत नाही.

AK-47 परवडणारं शस्त्र : एके 47 हे कदाचित आज शस्त्र उत्पादनातील सर्वात स्वस्त शस्त्र आहे. काळ्या बाजारात 1000 यूएस डॉलर्सपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेले हे शस्त्र अनेकांच्या पसंतीस उतरलं आहे. मिखाईल कलाश्निकोव्हचे सैनिकासाठी नवनवीन उपाय शोधत होते. त्याच्या परिपूर्णतेच्या शोधामुळं एके 47 चा शोध लागला. जे मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठं प्राणघातक शस्त्र बनलं. एके 47 रायफल ही जगातील सर्वात आवडतं लहान शस्त्रं म्हणून गणलं जातं.

हेही वाचा -

  1. Anantnag Encounter : अनंतनागमध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरलं
  2. Anantnag Encounter : दहशतवाद्यांशी लढताना सैन्याच्या कर्नल, मेजरसह तीन अधिकाऱ्यांना वीरमरण
  3. Two Naxalites killed : पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, दोन नक्षलवादी ठार

ABOUT THE AUTHOR

...view details