राजस्थान -ब्रिटीश राजवटीदरम्यान, राजस्थानमधील अजमेर हे एकमेव शहर केंद्रशासित प्रदेश होते. येथे घडणाऱ्या प्रत्येक घटनेची चाहूल इंग्रजांना लागायची. अजमेरच्या केसरगंज भागातील हा गोल चक्कर स्वातंत्रासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांच्या प्रयत्नांचा साक्षीदार राहिला आहे. महान क्रांतीकारी अर्जूनलाल सेठींव्यतीरिक्त अनेक स्थानिक नेत्यांनी स्वातंत्रता आंदोलनात सहभाग घेतला होता. याच गोल चक्करावर एका बैठकीदरम्यान गोळीही चालली होती.
दोन मोठी धार्मिक स्थळं अजमेरमध्येच -
हिंदु आणि मुस्लीम धर्मीयांची दोन मोठी धार्मिक स्थळं एक म्हणजे पुष्करचे ब्रम्हमंदिर आणि ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दरगाह अजमेरमध्येच आहे. या ठिकाणी अनेक क्रांताकारी भाविकांच्या वेशात येत आणि संदेशांची देवाण घेवाण करत निघून जातं होते. नेताजी सुभाष चंद्र बोसही या ठिकाणी येऊन गेले होते. तर चंद्रशेखर आझाद आथेड बगीच्यातील एका झोपडीत राहायचे. भगत सिंहही याठिकाणी भेट देऊन गेले होते.
अर्जुनलाल सेठींनीही क्रांतीची ज्वाला तेवत ठेवली -
अजमेरमध्ये राहून अर्जुनलाल सेठींनीही क्रांतीची ज्वाला तेवत ठेवली सेठी यांनी 1905मध्ये बंगाल विभाजनाला विरोध केला. 1907मध्ये जैन शिक्षा सोसायटी या नावाने अजमेरमध्ये एका शाळेची स्थापना केली. 1908मध्ये या शाळेला जैन वर्धमान या नावाने जयपूरमध्ये स्थानांतर केले. ज्याच्या उद्देश क्रांतीकारकांना प्रशिक्षण देणं हा होता. 12 डिसेंबर 1912 रोजी गवर्नर जनरल लॉर्ड हार्डींगच्या कार्यक्रमात बॉ़म्ब फेकण्याची योजना आखली. बॉ़म्ब फेकणारे जोरावर सिंह आणि प्रतापसिंग यांना याच शाळेत प्रशिक्षण देण्यात आले होते. अजमेरच्या एका पाहडी भागात एक गुप्त रस्ता होता. या मार्गावर एक मोठी जागा होती. याच ठिकाणी क्रांतीकारी बॉम्ब बनवायचे.