अहमदाबाद -रेस्टॉरंटमध्ये जेवण्यास जाण्यासाठी आजकाल आपल्याला कोणतेही निमित्त पुरत असते. यासाठी आपण विशेष आशा रेस्टॉरंटची निवड करतो. असेच एक आगळे-वेगळे रेस्टॉरंट गुजरातमध्ये सुरू झाले आहे. गुजरातच्या लोकांसाठी एअरक्राफ्ट रेस्टॉरंट खुले झाले आहे. वडोदरा शहरातील तरसाली बायपासजवळ हे रेस्टॉरंट आहे. एअरक्राफ्ट थीम असलेल्या जगातील एकूण रेस्टॉरंटपैकी हे 9 वे रेस्टॉरंट आहे. तर भारतात याचा चौथा क्रमांक लागतो.
एअरक्राफ्ट रेस्टॉरंट तयार करण्यासाठी बंगळुरूमधील एका कंपनीकडून 1.40 कोटी रुपयांचा एअरबस 320 खरेदी करण्यात आल्याचे रेस्टॉरंट मालकाने सांगितले. विमानाचा प्रत्येक भाग वडोदरा येथे आणण्यात आल्यानंतर त्यांचे एका रेस्टॉरंटमध्ये रुपांतर करण्यात आले. हे एअरक्राफ्ट रेस्टॉरंट उभारण्यास एकूण खर्च 2 कोटी आला आहे. यात 102 लोक एकाचवेळी बसू शकतात. भंगार विमानाचा वापर करून हे रेस्टॉरंट उभारले आहे.