नवी दिल्ली -कोरोनाच्या काळात विदेशात अडकेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासासाठी टाटाकडे मालकी आलेली एअर इंडिया पुन्हा सक्रिय ( three flights between India Ukraine ) झाली आहे. एअर इंडियाची पुढील आठवड्यांत युक्रेनसाठी तीन उड्डाणे सुरू ( air India service for ukraine ) होणार आहेत.
युक्रेनवर आक्रमण करणार नसल्याचा रशियाकडून वारंवार दावा करण्यात येत आहे. प्रत्यक्षात रशियाने नौसेनेच्या अभ्यासाकरिता काळ्या सागरासह सीमेवर 1 लाख सैनिक तैनात केले ( Russian soldiers at Ukraine border ) आहे. युक्रेनवर रशिया आक्रमण करत असल्याने नाटो देशांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी काळजी घेण्यासाठी विविध देशांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
हेही वाचा-Russia Ukraine Crisis : इस्त्राईल आणि मोरोक्कोनेही नागरिकांना युक्रेन सोडण्याचा दिला इशारा
परराष्ट्र मंत्रालयाकडून नियंत्रण कक्षाची स्थापना
युक्रेनमध्ये भारतीय नागरिकांना माहिती व मदत करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने नियंत्रण कक्षाची ( control room for Indian Ukraine people ) स्थापना केली आहे. त्याचबरोबर युक्रेनमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पूर्व युरोपीय राष्ट्रांमध्ये भारतीयांसाठी 24 तास सुरू राहणारे हेल्पलाईन सुरू केली आहे.
हेही वाचा-Vladimir Putin : व्लादिमीर पुतिन अमेरिका नाटो चर्चा करण्यास उत्सुक
एअर इंडियाची तिकीट विक्री खुली
टाटा समूहाकडे एअर इंडियाची मालकी ( Air India booking for Ukraine service ) आली आहे. भारत आणि युक्रेनच्या बॉरिस्पिल आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान 22 फेब्रुवारी, 24 आणि 26 फेब्रुवारी रोजी तीन विमान उड्डाणे करण्यात येणार आहेत. एअर इंडियाची बुकिंग कार्यालय, वेबसाईट, कॉल सेंटर आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून बुकिंग सुरू राहणार आहे.
हेही वाचा-Russia Ukraine crisis : 'शांततापूर्ण आणि रचनात्मक मुत्सद्देगिरीने मार्ग काढणार; रशिया युक्रेन वादावर भारताची भूमिका
टीएस तिरुमूर्तींनी दिले स्पष्टीकरण
संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती (UN Ambassador T S Tirumurti) यांनी रशिया - युक्रेनमधील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सांगितले की, तणाव त्वरित कमी करता येईल असा तोडगा काढला जाईल. तिरुमूर्ती (UN Ambassador T S Tirumurti) म्हणाले की, भारत सर्व संबंधितांच्या संपर्कात आहे. राजनैतिक संवादातूनच हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे आमचे मत आहे. ते म्हणाले, "सर्व देशांचे कायदेशीर सुरक्षेचे हित लक्षात घेऊन, तणाव ताबडतोब कमी करता येईल आणि या प्रदेशात आणि त्यापलीकडे दीर्घकालीन शांतता आणि स्थैर्य प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवता येईल असा उपाय शोधण्यात भारताचे हित आहे," ते म्हणाले.