उत्तरकाशी ( उत्तराखंड ) : हवाई दलाच्या बहुउद्देशीय अवजड विमान AN-32 (Uttarkashi Air Force Aircraft AN 32) ने चिन्यालीसौर विमानतळावर तीनदा लँडिंग आणि टेकऑफचा यशस्वी सराव केला. हे विमान प्रथमच ग्वाल्हेर एअरबेसवरून चिन्यालिसौर विमानतळावर (Uttarkashi Chinyalisaur Airport) नियमित सरावासाठी आले आहे.
तीन दिवस सराव :चिन्यालीसौर विमानतळावर, वायुसेनेच्या बरेली एअरबेसवरून हेलिकॉप्टरने दोन सदस्यीय कम्युनिकेशन टीम आली आणि त्यानंतर एएन 32 हे विमान ग्वाल्हेर एअरबेसवरून उतरले. विमानाने आकाशात चक्कर मारली आणि विमानतळावर तीनदा लँडिंग आणि टेकऑफचा सराव करून ग्वाल्हेर एअरबेसवर परतले. विमानाचा हा सराव आजपासून तीन दिवस चालणार आहे. संपर्क पथक चिन्यालीसौर येथे थांबले आहे.