महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Air Fare Reduced : सरकारच्या हस्तक्षेपानंतर हवाई प्रवास दर 61 टक्क्यांनी झाले कमी: सिंधिया

दिल्लीपासून काही मार्गांवर हवाई भाडे 14 ते 61 टक्क्यांनी कमी झाले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही माहिती दिली. एअरलाइन्सच्या सल्लागार गटाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ज्योतिरादित्य सिंधिया
ज्योतिरादित्य सिंधिया

By

Published : Jun 8, 2023, 2:24 PM IST

नवी दिल्ली: दिल्लीहून जाणाऱ्या काही मार्गावरील हवाई प्रवासाचे भाडे कमी झाले आहेत. या हवाई प्रवासाचे भाडे साधरण 14 ते 61 टक्क्यांनी कमी झाल्याचमी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली आहे. सिंधिया यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि मंत्रालयाच्या देखरेखीच्या प्रयत्नांवर भर दिला. दिल्ली ते श्रीनगर, लेह, पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणच्या प्रवासासाठी जास्तीत-जास्त भाडे कमी केल्याबद्दल मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी समाधान व्यक्त केले.

सिंधिया यांनी दिली माहिती : पत्रकार परिषदेत बोलताना सिंधिया म्हणाले की, मला हे सांगताना आनंद होत आहे की 6 जून रोजी दिल्ली ते श्रीनगर, लेह, पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या फ्लाइटचे कमाल भाडे 14-61 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. डीजीसीए आणि मंत्रालय रोजच्या भाड्यावर लक्ष ठेवत आहेत. सोमवारी सिंधिया यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठक घेतली. ही बैठक एअरलाइन्स सल्लागार गटाने बोलावली होती. या बैठकीत सिंधिया यांनी विमान कंपन्यांना हवाई भाडे स्वयं-नियमन करण्याचे आणि वाजवी दराची पातळी निश्चित राखण्याचे आवाहन केले होते. दिल्ली ते श्रीनगर, लेह, मुंबई, पुणे, अहमदाबाद आणि बंगळुरू सारख्या शहरांसाठी भाडे दर वाढले आहेत. देशांतर्गत विमान तिकिटांच्या गगनाला भिडले असल्याने ते प्रवाशांच्या अडचणीत भर घालत आहेत.

प्रवास भाडेसाठी अल्गोरिदमचा वापर : यावेळी केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या काळात विमान वाहतूक क्षेत्रात गेल्या नऊ वर्षात केलेल्या कामांवर प्रकाश टाकला. सिंधिया म्हणाले की, एअरलाइन्सकडे हवाई भाडे ठरविण्याचे अधिकार आहेत. भाडे निश्चित करताना बाजारातील गतिशीलता आणि हवामानासह विविध घटक विचारात घेतले जातात. एव्हिएशन इंडस्ट्री प्रवास भाडे ठरवण्यासाच्या निर्णयासाठी अल्गोरिदमचा वापर करत असते. बाजार नियंत्रित असल्यास हवाई भाडे निश्चित करण्याचे अधिकार विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत. खासगी एअरलाइन्स कंपन्यांना आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या असतात. सर्व क्षेत्रात भाडे वाढण्याच्या मर्यादा असाव्यात. आपल्या मंत्रालयाची भूमिका स्पष्ट करताना सिंधिया म्हणाले की, मंत्रालयाची भूमिका नियम करणारी नसून सुधिवा देणारी आहे.

हेही वाचा -

  1. Scindia Thanked Maha Govt: विमानप्रवास होणार स्वस्त, विमानाच्या इंधनावरील व्हॅट केला कमी, सिंधियांनी मानले राज्य सरकारचे आभार
  2. Jyotiraditya Scindia assumes Steel Ministry: ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पोलाद मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला

ABOUT THE AUTHOR

...view details