लखनौ :राजधानी लखनौ येथिल चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी लखनौहून दिल्लीला उड्डाण करणाऱ्या एअर एशियाच्या विमानाचा हायड्रोलिक पाइप अचानक फुटला या प्रकारामुळे धावपट्टीवर हायड्रोलिक तेल सांडले. काही वेळातच सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले. विमानात अचानक बिघाड झाल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता.
एअर एशिया विमानाचा हायड्रोलिक पाईप फुटल्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले. हा प्रकार समोर आल्या नंतर एअर एशिया कंपनीने प्रवाशांसमोर दोन पर्याय ठेवले, त्यांच्या सांगण्यानुसार एकतर प्रवाशांनी त्यांचे पैसे परत घ्यावे किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये जागा बुक करा. अचानक आलेल्या अशा प्रस्तावामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. पैसे वापस घेतले तर लगेच दुसरी सोय होणार नव्हती तर दुसरीकडे एक दिवस तेथे थांबावे लागणार होते.
लखनौमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला जाणारे एअर एशिया फ्लाइट I 5330 विमानाचा हायड्रोलिक पाईप तुटल्यामुळे आणि हायड्रॉलिक ऑइल धावपट्टीवर सांडल्यामुळे शेवटच्या टप्प्यात हे विमान रद्द करण्यात आले. त्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.