हैदराबाद : एआयएमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी यूपीमधील माफिया अतिक अहमदच्या मुलाच्या एन्काऊंटरवर निशाणा साधला आहे. त्यांनी या चकमकी प्रकरणी भाजप तसेच योगी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत ओवैसी म्हणाले की, भाजप, यूपी सरकार एन्काउंटर करून कायद्याची पायमल्ली करत असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे.
योगी सरकारवर प्रश्न : उमेश पाल हत्येप्रकरणी यूपी एसटीएफच्या कारवाईनंतर ओवैसींची प्रतिक्रिया आली आहे, ज्यामध्ये अतिकचा मुलगा असद, त्याचा साथीदार गुलाम यांचा झाशीत झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात युपी पोलिसांना यश आले आहे. यावरुन तेलंगणातील निजामाबादमध्ये एआयएमआयएमच्या रॅलीला संबोधित करताना पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप आणि योगी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यूपीच्या चकमकीवर बोलतांना ओवेसी म्हणाले की, ज्यांनी जुनैद, नसीर यांची हत्या केली त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? तुम्ही धर्माच्या नावावर एन्काउंटर करता असा आरोप त्यांनी केला आहे.