नवी दिल्ली - लहान आणि मध्यम उद्योगांवर तसेच स्टार्टअप इकोसिस्टमवर विशेष लक्ष केंद्रित करून, शुक्रवार (दि. २३ डिसेंबर)रोजी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 10व्या ईशान्य महोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
MSME: ईशान्य महोत्सवातून मध्यम उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे उद्दीष्ठ -नारायण राणे - लहान आणि मध्यम उद्योग
नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये 10व्या ईशान्य महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये लघु आणि मध्यम उद्योग तसेच स्टार्टअप इकोसिस्टमवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
असामान्य प्रतिभांना एक आकर्षक व्यासपीठ - ईशान्येकडील स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्याबरोबरच, हा महोत्सव रोजगाराच्या संधी निर्माण करण्यातही मदत करेल. "दिल्ली येथे आयोजित या महोत्सवाचा मुख्य उद्देश ईशान्य भारतातील उत्कृष्ट सांस्कृतिक संसाधने प्रदर्शित करणे आणि या क्षेत्रातील असामान्य प्रतिभांना एक आकर्षक व्यासपीठ प्रदान करणे हा आहे असे नारायण राणे म्हणाले. ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
सहभाग - हातमाग, हाताने तयार केलेले दागिने, हस्तकला, कृषी-उत्पादन उत्पादने आणि ईशान्येकडील प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ या महोत्सवात 100 हून अधिक एमएसएमई व्यावसायिक सहभागी होत आहेत.