महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका...एम्सकडून तयारी सुरू - pediatric department of AIIMS

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लॅन्सेट इंडिया टास्क फोर्सने बालरुग्णांकरिता नियोजन, प्रोटोकॉल आणि धोरणाकरिता मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. इंडियन अॅकडमी ऑफ पेडियाट्रिक्सने 6 हजारहून अधिक लहान मुलांच्या डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे.

AIIMS Delhi
दिल्ली एम्स

By

Published : Jul 14, 2021, 4:48 PM IST

नवी दिल्ली- कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन एम्सने तयारी सुरू केली आहे. दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) तीन दिवस परिचारिकांना बालरुग्ण विभागात प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुलांना कोरोनाची अधिक प्रमाणात लागण झाल्याचे दिसून आले आहे. तसेच कोरोना झाल्यानंतर मुलांमध्ये विविध रोगांची लक्षणे दिसून आले आहेत. त्यामुळे रुग्णालयांना कोरोनाबाधित बालरुग्णांकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा-बेटियों को क्या खिलाते हो ताऊ? महावीर फोगट यांना मोदींकडून विचारणा

इंडियन अॅकडमी ऑफ पेडियाट्रिक्सने डॉक्टरांना प्रशिक्षण

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लॅन्सेट इंडिया टास्क फोर्सने बालरुग्णांकरिता नियोजन, प्रोटोकॉल आणि धोरणाकरिता मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. इंडियन अॅकडमी ऑफ पेडियाट्रिक्सने 6 हजारहून अधिक लहान मुलांच्या डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे.

हेही वाचा-फरसाण खाताना तुकडा गळ्यात अडकून एकुलत्या एक मुलीचा मृत्यू

कोरोनाचे नवीन 38,792 रुग्ण

गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे नवीन 38,792 रुग्ण आढळले आहेत. तर 41 हजार रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर 624 जणांना कोरोनाने मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

पंतप्रधानांनी तिसऱ्या लाटेबाबत जनतेला केले सावध

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्रासह देशाला मोठा फटका बसला. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. काही ठिकाणी तर परिवारातीलच अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जून महिन्यात ही लाट ओसरताना दिसत असल्यावर राज्य सरकारसह केंद्रानेही निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. मात्र, निर्बंध हटवल्यावर जनता आणखीनच बेजबाबदार पणे वागतंय, असे निदर्शनास आले असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला नुकतेच इशारा दिला आहे.

ऑक्टोंबर ते नोव्हेंबर तिसरी लाट येण्याची शक्यता

नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यास कोरोनाची तिसरी लाट (covid third wave) ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या कालावधीत पुन्हा येऊ शकते, असे कोरोना मॉडेलच्या सरकारी समितीतील संशोधक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले आहे. संशोधक मनिंद्र अग्रवाल हे सध्या 'सूत्र मॉडल' वर काम करत आहे. ज्यात कोरोनाच्या गणितीय मॉडेल्सचा वापर केला जात आहे. ते म्हणाले की, या कोरोना विषाणूचा नवीन संसर्ग निर्माण झाल्यास तिसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणावर फैलाव हेऊ शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details