महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तामिळनाडू विधानसभा निवडणूक : अण्णाद्रमुकची पहिली यादी जाहीर - तामिळनाडू अण्णाद्रमुक उमेदवार यादी

पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी अण्णाद्रमुकने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, मुख्यमंत्री पलानीस्वामी हे त्यांच्या सालेम जिल्ह्यातील येडाप्पडी मतदारसंघातून, तर उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम हे थेनी जिल्ह्यातील बोडिनायाकनूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

AIADMK  releases first list, EPS to contest from Edappadi
तामिळनाडू विधानसभा निवडणूक : अण्णाद्रमुकची पहिली यादी जाहीर

By

Published : Mar 5, 2021, 5:17 PM IST

चेन्नई : तामिळनाडूमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी अण्णाद्रमुकने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये सहा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

सहा मतदारसंघातील उमेदवार जाहीर..

या यादीनुसार, मुख्यमंत्री पलानीस्वामी हे त्यांच्या सालेम जिल्ह्यातील येडाप्पडी मतदारसंघातून, तर उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम हे थेनी जिल्ह्यातील बोडिनायाकनूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते डी. जयकुमार (मत्स्योद्योग मंत्री) हे रॉयापुरम, आणि सी. व्ही. शंमुगम (कायदेमंत्री) हे विल्लुपुरममधून निवडणूक लढवतील. आमदार एस. पी. शानमुंगनाथन आणि एस. थेनमोळी हे अनुक्रमे श्रीवैगुंडम आणि नीलाकोट्टी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

बुधवारीच शशीकला यांनी राजकारणाला रामराम ठोकला होता. त्यानंतर आता ही यादी जाहीर करण्यात आली आहे. शशीकला यांनी आपल्या समर्थकांचे आभार मानत, द्रमुकला या निवडणुकीत हरवण्याचे आवाहन तामिळनाडूच्या जनतेला केले होते.

हेही वाचा :व्ही. के. शशिकला यांचा राजकारणाला रामराम; समर्थकांचे मानले आभार

ABOUT THE AUTHOR

...view details