महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Asia Cup 2022 Team India आशिया चषकापूर्वी भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या, या सदस्याला झाली कोरोनाची लागण - भारतीय क्रिकेट संघ

28 ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक स्पर्धेत Asia Cup 2022 Team India भारत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. 27 ऑगस्टपासून यूएईमध्ये आशिया कपला Asia Cup 2022 सुरुवात होणार आहे. पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. आशिया कप 2022 मध्ये एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.

Team India
भारतीय संघ

By

Published : Aug 23, 2022, 12:49 PM IST

मुंबईयूएई मधील आशिया कप टी-20 स्पर्धेत भारताच्या सलामीच्या मोहिमेपूर्वी, संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कोविड-19 Covid-19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला Rahul Dravid Infected with covid-19 आहे. द्रविड नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी झिम्बाब्वेला गेला नव्हता, जी केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने 3-0 ने जिंकली. आता आशिया चषकापूर्वी भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयनच्या वरिष्ठ निवड समितीने व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे द्रविड Coach Rahul Dravid, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांच्यासह प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना विश्रांती दिली होती.भारत 28 ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध आशिया चषक स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकात ICC T20 World Cup पाकिस्तानविरुद्ध झालेल्या 10 विकेट्सच्या पराभवाचा बदला घेण्याचा विचार करेल. India Today.in वरील वृत्तात म्हटले आहे की, द्रविड भारताच्या सलामीच्या सामन्यासाठी संघात सामील होईल की नाही हे स्पष्ट नाही. वैद्यकीय कर्मचार्‍यांकडून मान्यता मिळाल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड यूएईला जाणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. तथापि, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने Bcci द्रविड कोविड -19 पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी अद्याप केलेली नाही.

हेही वाचा -India vs Zimbabwe ODI Series झिम्बाब्वेला सलग चौथ्यांदा दिला क्लीन स्वीप, तिसऱ्या सामन्यात भारताचा 13 धावांनी विजय

ABOUT THE AUTHOR

...view details