महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Agra Crime News : गावातील तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून युवतीची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - खेरागड पोलीस

Agra Crime News : आग्र्यातील एका गावात तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून एका मुलीनं आत्महत्या केलीय. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

Agra Crime News
Agra Crime News

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 12:49 PM IST

आग्रा Agra Crime News : जिल्ह्यातील खेरागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून एका युवतीनं आत्महत्या केलीय. ही मुलगी आंघोळ करत असताना मुलांनी तिचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. यानंतर ते तिला ब्लॅकमेल करत होते. एवढंच नाही, तर दोन दिवसांपूर्वी दोन्ही आरोपींनी तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्नही केला. मुलीनं विरोध केल्यावर आरोपीनं तिला मारहाण केली आणि तिच्या मानेवर चाकूही मारला, अशी माहिती खेरागडचे एसीपी महेश कुमार यांनी दिली आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गावातील दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा पोलिसांची पथकं शोध घेत आहे.

नेमकं प्रकरण काय : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेरागड पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात शनिवारी एका 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला. या प्रकरणी रविवारी मुलीच्या वडिलांनी खेरागड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद दिली. यात वडिलांनी आरोप केलाय की, शेजारी राहणारे अभिषेक आणि विष्णू आपल्या मुलीला अनेक दिवसांपासून सतत त्रास देत होते. आरोपी तरुणानं एकदा त्यांची मुलगी आंघोळ करत असताना तिचा व्हिडिओ बनवला होता. त्या आधारे मुलीला ब्लॅकमेल केलं जात होतं. 13 ऑक्टोबर 2023 रोजी अभिषेक आणि विष्णू हे दोघं भाऊ गच्चीतून तिच्या घरात घुसले. त्याच्या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. याला मुलीनं विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आली. त्याच्या गळ्यावर चाकू ठेवण्यात आला होता. नराधमांच्या या कृत्याला कंटाळून मुलीनं आत्महत्येचं पाऊल उचललं.

आरोपींविरोधांत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल : खेरागडचे एसीपी महेश कुमार यांनी सांगितलं की, पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध कलम 323, 354, 452, 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या तरुणीनं शनिवारी आत्महत्या केली होती. याबाबतची माहिती रविवारी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मुलीच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं. त्याच खोलीत सापडलेली सुसाईड नोटही मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलीय. पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे गुन्हा दाखल केला असून सुसाईड नोट फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

हेही वाचा :

  1. Cab Driver Rape Attempt : धक्कादायक! धावत्या कारमध्ये चालकानं केला तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
  2. Brother Sexually Assaults Minor Sister : सख्ख्या भावाचा अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार; पीडिता गरोदर
  3. Bareilly Crime News : कुठुन येते इतकी क्रुरता? विनयभंगाला विरोध केल्यानं ट्रेनसमोर फेकले; विद्यार्थीनीची प्रकृती चिंताजनक

ABOUT THE AUTHOR

...view details