नवी दिल्लीAgniveer Akshay Gawate News- महाराष्ट्राचे सुपूत्र, अग्निवीर (ऑपरेटर) अक्षय लक्ष्मण गवते यांना सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आले. याबाबत सैन्यदलानं एक्सवर पोस्ट करत अग्निवीर सैनिकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांना देणाऱ्या आर्थिक मदतीबाबत सविस्तर माहिती दिली. सैन्यदलानं एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, या दु:खाच्या प्रसंगी सैन्यदल हे जवानाच्या शोकाकुल कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे. मृत अग्नीवीरच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्याबाबत सोशल मीडियावरील परस्परविरोधी संदेश पाहता त्याबाबत स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे.
सैन्यदलाच्या माहितीनुसार अग्निवीर रँकमधील सैनिकाला लढाईत वीरमरण आल्यास त्यांच्या वारसाला आर्थिक रक्कम दिली जाते.
अग्निवीरच्या नातेवाईकाला अशी मिळणार रक्कम
- नॉन-कंट्रिब्युटरी इन्शुरन्स रक्कम- 48 लाख रुपये
- सेवा निधीतून अग्निवीर (30 टक्के) योगदान
- सरकारच्या समान योगदानासह आणि त्यावर व्याज- 44 लाख रुपये
- मृत्यूच्या तारखेपासून चार वर्षे पूर्ण होईपर्यंत शिल्लक कालावधीचा देय -(तात्काळ प्रकरणात 13 लाखांपेक्षा जास्त)
- आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युअल्टी फंड- 8 लाख रुपयांचे योगदान.
- AWWA कडून - 30 हजार रुपयांची तात्काळ आर्थिक मदत
राहुल गांधींनी काय म्हटले?काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक्स पोस्टवर म्हटले, अग्निवीर अक्षय गवते हे सियाचीनमध्ये शहीद झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेत. एक जवान देशासाठी शहीद झाला तरीही ग्रॅच्युइटी नाही. त्यांच्या सेवेदरम्यान इतर कोणत्याही सुविधा नाहीत. शहीद झाल्यावर त्यांच्या कुटुंबाला पेन्शन नाही. अग्निवीर म्हणजे भारताच्या वीरांचा अपमान करण्याचा डाव आहे.
आत्महत्या केलेल्या अग्निवीरला लाभ नाही-अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून भरती झालेला पंजाबचा रहिवासी अमृतपाल सिंग 11 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ मृत्यू झाला होता. मात्र, त्यांना सैन्यदलाप्रमाणं सन्मान न दिल्यानं पंजाब काँग्रेसनं भाजपावर टीका केली होती. एक्सवरील एका पोस्टमध्ये, सैन्यानं म्हटलंय की, अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या दुर्दैवी मृत्यूशी संबंधित काही गैरसमज आणि चुकीचं वर्णन करण्यात आलंय. अग्निपथ सैनिकांमध्ये फरक करत नसल्याचं सैन्यदलानं संगितलं
काय आहेत अग्निवीर योजनेचे नियम-अग्निपथ योजनेत 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना फक्त चार वर्षांसाठी भरती करण्यात येते. त्यातील 25 टक्के अग्नीवीर तरुणांची सेवा आणखी १५ वर्षे करण्याची तरतूद आहे. अग्नीवीर योजना ही स्वतंत्र रँक असूनही त्यामधील जवानाची कोणत्याही रेजिमेंट आणि युनिटमध्ये पोस्ट केले जाते. आर्थिक लाभ कसा मिळतो- अग्निवीरांच्या मासिक पगाराच्या 30 टक्के रक्कम सक्तीने कॉर्पसमध्ये जमा केली जाते. तितकीच रक्कम सरकारद्वारे योगदान दिले जाते. सेवेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर, भारत सरकारकडून 5.02 लाख रुपये दिले जाते. तसेच 10.04 लाख रुपयांची रक्कम आणि जमा झालेले व्याज अग्निवीरांना दिले जाते.
हेही वाचा-
- Agniveer Amritpal : अग्निवीर म्हणून भरती झालेल्या सैनिकाला मृत्यूनंतर हुतात्म्याचा सन्मान का नाही? सैन्यानं दिलं 'हे' स्पष्टीकरण
- Agniveer Prajwal Tawari : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; प्रज्वल बनला पेणचा पहिला अग्निवीर