नवी दिल्ली -केंद्रातील मोदी सरकारने 14 जून रोजी सैन्यात भरतीसाठी अग्निपथ योजना जाहीर केली होती. तेव्हापासून देशातील अनेक राज्यांमध्ये निदर्शने सुरू आहेत. विरोध पाहता सरकार आणि तिन्ही लष्कराच्या वतीने भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. त्याचवेळी, आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी अग्निपथ योजना देशासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
डोवाल म्हणाले, काल आपण जे करत होतो, तेच भविष्यात करत राहिलो तर आपण सुरक्षित राहूच असे नाही. उद्याची तयारी करायची असेल तर बदलावं लागेल. हे आवश्यक होते कारण भारतात, भारताच्या आजूबाजूचे वातावरण बदलत आहे.