महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Kashmir Pandits: आम्हाला जगण्याचा अधिकार द्या! काश्मीर पंडितांच्या हत्येनंतर संतप्त जमाव आक्रमक - काश्मिरी पंडीत

जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात शनिवारी एका काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी शोपियानमधील चौधरी गुंड गावातील तारकनाथ भट यांचा मुलगा पूरण कृष्ण भट याला गोळ्या घालून गंभीर जखमी केले. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

काश्मीर पंडितांच्या हत्येनंतर संतप्त जमावाकडून आक्रमक निदर्शने
काश्मीर पंडितांच्या हत्येनंतर संतप्त जमावाकडून आक्रमक निदर्शने

By

Published : Oct 15, 2022, 7:33 PM IST

जम्मू-बडगाम - जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात शनिवारी एका काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी शोपियानमधील चौधरी गुंड गावातील तारकनाथ भट यांचा मुलगा पूरण कृष्ण भट याला गोळ्या घालून गंभीर जखमी केले. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याच जिल्ह्यातील छोटीगाम गावातील आणखी एक काश्मिरी पंडित सुनील कुमार भट यांची दहशतवाद्यांनी यावर्षी १६ ऑगस्ट रोजी हत्या केली होती. या हल्ल्यात आणखी एक काश्मिरी पंडित पारतींबरनाथ भट जखमी झाले आहेत.

काश्मीर पंडितांच्या हत्येनंतर संतप्त जमावाकडून आक्रमक निदर्शने

आम्हाला जगण्याचा अधिकार द्या - त्याचवेळी या घटनेच्या निषेधार्थ काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने झाली (Angry Kashmiri Pandits protest). जम्मूमधील स्थलांतरित काश्मिरी पंडित कर्मचारी पूरण कृष्ण भट यांच्या हत्येचा निषेध करत आहेत. टार्गेट किलिंगच्या निषेधार्थ शनिवारी शेकडो विस्थापित काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांनी खोऱ्यातून त्यांची बदली करण्याची मागणी करत जम्मू-अखनूर रस्ता रोखून धरला. ते म्हणाले, आम्हाला जगण्याचा अधिकार द्या.

काश्मीर पंडितांच्या हत्येनंतर संतप्त जमावाकडून आक्रमक निदर्शने

कारवाई होत नाही - दुसरीकडे, बडगाममधील पंडित कॉलनी शेखपोरामध्ये राहणाऱ्या काश्मिरी पंडितांनी हुम्ममा-बडगाम रस्ता रोखून धरला. गेल्या वर्षी राहुल भटच्या हत्येनंतर त्यांना सुरक्षेचे आश्वासन मिळाले होते. मात्र, आजपर्यंत काहीही झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासन हलके घेत असून कारवाई होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मदतीचे आश्वासन - राहुल भट यांच्या हत्येपासून ते सातत्याने निदर्शने करत आहेत आणि जम्मूला मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित करण्याची मागणी करत आहेत. यादरम्यान प्रशासनाचे उच्च अधिकारी त्यांना भेटायला आले, अगदी एलजीनेही त्यांची भेट घेतली आणि मदतीचे आश्वासन दिले. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार काहीही झाले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details