नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल शहबाझ शरीफ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये पंतप्रधानांनी दहशतवादमुक्त प्रांत ठेवण्यासाठी दोन्ही देश काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. (Shahbaz Sharif sworn as prime minister) दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात शहबाझ शरीफ यांनी काश्मीरबाबतचा अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या - काश्मीर खोऱ्यातील लोक रक्ताळलेले असून, पाकिस्तान त्यांना 'राजनैतिक व नैतिक पाठिंबा' देईल. तसेच, हा मुद्दा प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित करेल, असेही शरीफ म्हणाले आहेत. (Shahbaz Sharif younger brother of Nawaz Sharif) सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहबाझ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली. तत्पुर्वीच त्यांनी आपल्याला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. मात्र, काश्मीर मुद्दा सुटल्याशिवाय हे साध्य होऊ शकत नाही असेही ते म्हणाले. राजकीय उलथापालथीनंतर इम्रान खान यांना हटवून पंतप्रधानपदी आलेले ७० वर्षांचे शहबाझ यांनी पंतप्रधान होण्याच्या काही तास आधीच काश्मीरबद्दल वक्तव्य केले होते. दरम्यान, ते पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.