नई दिल्ली -दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सीबीआयच्या छापेमारी केली आहे. त्यानंतर आप आणि भाजपमधील राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. Manish Sisodia सध्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.
षडयंत्र रचणाऱ्या लोकांसमोर झुकणार नाही मनीष सिसोदिया यांनी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. Delhi Deputy Chief Minister Sisodia tweet ते म्हणाले, की मला भाजपकडून एक मेसेज आला आहे, ज्यामध्ये आपण आपला सोडून भाजपमध्ये या, सीबीआय-ईडीचे सर्व खटले बंद करण्यात येतील, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. त्यावर मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे, माझे मुंडके कापले तरी मी भ्रष्टार करणाऱ्या, षडयंत्र रचणाऱ्या लोकांसमोर झुकणार नाही असे म्हत त्यांनी माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. त्यामुळे तुम्हाला जे करायचे आहे ते करा मी घाबरत नाही असही सिसोदिया म्हणाले आहेत.
गुजरातसाठी काय केले दरम्यान, सिसोदिया यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की, मी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर जात आहे. ज्या पद्धतीने दिल्लीत काम झाले आहे आणि पंजाबमध्ये काम सुरू आहे. यामुळे प्रभावित होऊन गुजरातच्या जनतेला केजरीवाल यांना संधी द्यायची आहे. भाजपने पहिल्या 27 वर्षात गुजरातसाठी काय केले नाही हे केजरीवाल सरकार दाखवून देईल असही ते म्हणाले आहेत.
पकडल्यावर प्रत्येक चोर रडतो यानंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या. भाजप नेते कपिल मिश्रा यांनीही ट्विट केले आहे की, आयुष्यभर औरंगजेबाची पूजा केली आणि चोरी, लाचखोरीप्रकरणी तुरुंगात जाण्याची वेळ आली तेव्हा महाराणा प्रतापांची आठवण झाली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, केस माफ करून भाजपमध्ये जाण्यासाठी तुम्ही किती पापड केले. हे माध्यम आणि राजकीय वर्तुळातील सर्वांना माहीत आहे. ते म्हणाले की, पकडल्यावर प्रत्येक चोर रडतो असही ते म्हणाले आहेत.