नवी दिल्ली :पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर यास (यश) चक्रीवादळ धडकणार असून, यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हे चक्रीवादळ काही तासांमध्ये तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. या पार्श्वभूमीवर देशाची पूर्व किनारपट्टी सज्ज झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळाचे केंद्र सध्या पोर्ट ब्लेअरपासून ६०० किलोमीटर दूर आहे. येत्या २४ तासांमध्ये हे चक्रीवादळ आणखी तीव्र होईल. 26 मे रोजी हे चक्रीवादळ वादळ देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्या राज्यांना धडकेल. यास वादळाचा सर्वाधिक परिणाम अंदमान आणि निकोबार बेटे, ओडिशा आणि पश्चिम बंगालवर होईल. या राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टी भागांना इशारा दिला आहे. किनारपट्टी भागात राहणार्या लोकांना, विशेषत: मच्छिमारांना या काळात समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. सध्या समुद्रावर गेलेल्या मच्छिमारांना 23 मे पर्यंत परतण्यास सांगण्यात आले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यास वादळाची तीव्रता मागील वर्षी आलेल्या 'अम्फान' प्रमाणेच असू शकते. गेल्या वर्षी जून महिन्यात अम्फान चक्रीवादळ आले होते. या वादळाचा तडाखा पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागांना बसला होता.
अमित शाह घेणार बैठक..