महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ashok Gehlot Vs Sachin Pilot : राहुल गांधींचे भावनिक आवाहन; गेहलोत-पायलट एकत्र - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत

राजस्थानचा राजकीय निर्णय घेऊन राहुल गांधींना अमेरिकेला जायचे होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पायलटने सर्व काही राहुल गांधी, काँग्रेस नेतृत्वावर सोडले होते. पक्ष त्यांच्या सन्मानाची पूर्ण काळजी घेईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी बैठकीत दोन्ही नेत्यांना दिले. त्यांच्या आवाहनावर दोन्ही नेत्यांनी एकत्र काम करण्याचे मान्य केले आहे.

Ashok Gehlot Vs Sachin Pilot
Ashok Gehlot Vs Sachin Pilot

By

Published : May 30, 2023, 7:46 PM IST

नवी दिल्ली :राहुल गांधी यांनी मंगळवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट यांना भावनिक आवाहन केले होते. त्यांनी राजस्थानच्या दोन्ही नेत्यांना काँग्रेस ऐक्याचे चित्र लोकांसमोर मांडण्यास सांगितले होते. मात्र, यासोबतच त्यांनी दोन्ही नेत्यांमधील समेट घडवण्याचे काम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवले आहे.

राज्यातील समस्यांचे निराकरण झाल्याचा मला आनंद आहे. आम्ही लवकरच समस्यांच्या खोलात जाऊन सर्वसमावेशक तोडगा काढण्याचे काम करू. - सुजिंदर सिंग रंधावा, राजस्थानचे प्रभारी

खरगे, वेणुगोपाल यांच्याशी पहिली चर्चा : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी खरगे यांनी चर्चेच्या पहिल्या फेरीत गेहलोत, पायलट या दोघांशी स्वतंत्र चर्चा केली. त्यांनी दोन्ही नेत्यांना आपापसातील वाद संवादातून सोडवण्याचा सल्ला दिला. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनीही राजस्थानच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांशी सुमारे चार तास चर्चा केली. दोन्ही नेत्यांशी सखोल चर्चा केल्यानंतर त्यांनी औपचारिक घोषणा केली की, दोन्ही नेत्यांनी राजस्थानमध्ये, पक्षासाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले आहे.

नाराज काँग्रेस नेत्यांचे संकट :पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण संभाषणात राहुल गांधीही सर्व वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते. त्यांना अमेरिका दौऱ्यापूर्वी राजस्थान काँग्रेसचे संकट सोडवायचे होते. त्यांनी गेहलोत, पायलट यांना भावनिक आवाहन केल्यानंतर दोघांनीही माघार घेत पक्षासाठी काम करण्याचे मान्य केले आहे. राहुल गांधी यांनी दोघांनाही पक्ष तुमच्या हिताचे रक्षण करेल, असे आश्वासन दिल्यानंतर दोन्ही नेते एकत्र काम करण्यास तयार झाले आहेत.

राहुलच गांधींनी दिले वचन : राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेस नेते सचिन पायलट या दोघांनाही सांगितले की त्यांना त्यांची राजकीय स्थिती माहीत आहे. नेत्यांना त्यांच्या राजकीय उंचीनुसार सन्मान मिळेल, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे अश्वासन राहुल गांधी यांनी दोघांनाही दिले आहे. मात्र त्याआधी त्यांना एकत्र येऊन राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाला मदत करावी लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यांनी दोन्ही नेत्यांना सांगितले की, कर्नाटक जिंकल्यानंतर आम्हाला राजस्थान जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी याबाबत विचार करावा असे राहुल गांधींनी त्यांना सांगितल्याची सुत्रांची माहिती आहे.

आगामी निवडणुकीवर परिणाम : राज्यातील घडामोडींचा मध्य प्रदेश, छत्तीसगडवर काय परिणाम होईल, याचा विचार दोघांनीही करावा. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये एकाच वेळी निवडणुका होणार आहेत. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यांच्या भावनिक आवाहनानंतर वेणुगोपाल, गेहलोत आणि पायलट मीडियासमोर हजर झाले. मात्र, केवळ सर्व संघटनांचे प्रभारी, एआयसीसीचे सरचिटणीस मीडियाशी बोलले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मुख्यमंत्र्यांविरोधात बंडखोर भूमिका घेणारे सचिन पायलट मात्र, यांनी यावेळी मौन बाळगले.

वाद आताच थांबला, संपलेला नाही : पक्षाच्या अंतर्गत माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या विजयासाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले आहे. परंतु पायलट अजूनही आपल्या प्रमुख मागण्यांवर ठाम आहेत. तर गेहलोतही त्यांच्या भूमीकेवर ठाम आहेत. येत्या काही दिवसांत मल्लिकार्जून खर्गे दोन्ही नेत्यांची भेट घेण्याची शक्याता आहे. काँग्रेस अध्यक्ष सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत तसेच तडजोड करण्यासाठी विविध पर्यायांवर विचार करत आहेत.

पायलटकडे महत्वाची जबाबदारी :पायलटला संघटनेत प्रभावी स्थान मिळू शकते, परंतु गेहलोत सहमत होतील का असा प्रश्न निर्माण होत आहे. एआयसीसीच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्याने सांगितले की, शांतता उपक्रम म्हणून, पायलटला राज्य युनिटचे प्रमुख किंवा प्रचार समितीचे प्रमुख बनून संघटनेत महत्त्वाची भूमिका दिली जाऊ शकते. येत्या निवडणुकीच्या व्यवस्थापनात, तिकीट वितरणात त्यांचा सहभाग सुनिश्चित होण्याची शक्याता आहे. गेहलोत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राज्याचे प्रमुख गोविंद सिंग दोतासरा यांचे काय होणार, असाही प्रश्न उपस्थित होणार आहे.

संघटनेशिवाय राजकारणाचे अनेक गहन प्रश्न : सचिन पायलट राज्याचे प्रमुख झाले तर दोतसराला कोणते पद मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलट हे केवळ आमदार असून त्यांचा संघटनेत कोणताही हस्तक्षेप नाही. गेहलोत पायलयट यांना किती जागा द्यायला तयार आहेत हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पक्षाच्या सूत्रांच्या मते, भाजप नेत्या, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी जाहीर करण्याच्या पायलटच्या मागणीचे उत्तरही खर्गे यांना शोधावे लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details