अहमदाबाद ( गुजरात ) : दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू ( heavy rains in Gujarat ) आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे शहरातील रस्त्यांचीच नव्हे तर राष्ट्रीय महामार्गाचीही मोठी दुर्दशा झाली आहे. मुसळधार पावसामुळे वापी-सिल्वासा राष्ट्रीय महामार्ग-48 वर मोठमोठे खड्डे पडले ( NH 48 covered in potholes filled with water ) आहेत. गुजरातमधील पावसाने प्रभावित भागातून किमान 1,300 लोकांना वाचविण्यात आले आहे. त्यापैकी गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातून एका दिवसात 811 लोकांना वाचवण्यात आले आहे.
स्वच्छतेला झाली सुरुवात :शनिवारी बचावकार्य राबविण्यात आले. या कारवाईत तटरक्षक दल, एनडीआरएफ आणि स्थानिक जलतरणपटूंनी रात्रभर परिश्रम घेऊन सर्वांना सुखरूप बाहेर काढले. नवसारीत एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. आणखी टीम्स स्टँडबायवर आहेत आणि केंद्राशी समन्वय सुरू आहे. सुरत महानगरपालिकेच्या 200 कामगारांच्या पथकाने 'ऑपरेशन निरामय' अंतर्गत नवसारी जिल्ह्यात सहा जेसीबी, पाच डिवॉटरिंग पंप, टिप्पर ट्रक, 47 हून अधिक गोल्फ मशीन साफसफाई, गाळ काढणे आणि औषध फवारणीसाठी तैनात केले आहेत.