समस्तीपूर : बिहारमधील समस्तीपूर ( Crime in Samastipur ) जिल्ह्यातील कल्याणपूरमधून एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. ( Molestation with Girl in Samastipur ) समस्तीपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार ( Minor Girl was Gang Raped in Bihar ) केल्यानंतर तिचे गुप्तांग, स्तन आणि जीभ कापून अर्धमेल्या अवस्थेत फेकण्यात आले. ही हृदयद्रावक घटना समस्तीपूरच्या चकमेहसी पोलीस स्टेशन ( Heartbreaking Incident From Chakmehsi Police ) परिसरातील आहे. पीडित 13 वर्षीय मुलीचे 11 नोव्हेंबर रोजी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर हा प्रकार तिच्यासोबत केला गेला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस तपासात गुंतले आहेत.
बलात्कारानंतर गुप्तांग, स्तन आणि जीभ कापली : 11 नोव्हेंबर रोजी मुलीला घरातून उचलून नेण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिला घराजवळील बागेत बेशुद्धावस्थेत सोडले. बराच शोध घेतल्यानंतर बागेत मुलगी अर्धमेल्या अवस्थेत सापडली. आता ग्रामस्थांकडून देणगी जमा करून मुलीवर उपचार केले जात आहेत. त्याच वेळी, मुलगी जीवन आणि मृत्यू यांच्यात झुंज देत आहे. घटना 11 नोव्हेंबरची आहे. रविवारी सीपीआय-एमएलच्या पथकाने गावात माहिती घेतली असता ही बाब उघडकीस आली.