नवी दिल्ली - चीनशी झालेल्या करारानुसार पूर्व लडाखच्या पँगाँग तलाव परिसरातून सैन्याने माघार घेतली आहे. भारतासाठीचा धोका कमी झाला आहे. मात्र, अद्याप धोका संपला नसल्याचे लष्कराचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी गुरुवारी सांगितले. गेल्या वर्षी मे महिन्यात दोन्ही देशामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी पूर्वीच्या लडाखमधील भारताच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशात चीनी सैनिक अद्याप आहेत, म्हणणे चुकीचे ठरेल, असे नरवणे म्हणाले. 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह'मध्ये ते बोलत होते.
चिनी सैनिक भारताच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशात आले नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का, या प्रश्नाला त्यांनी हो असे उत्तर दिले.
सीमेवर तणाव असून संघर्षाची परिस्थिती असल्याने परिसरात पेट्रोलिंग सुरू झाले नाही. अशी काही क्षेत्रे आहेत जिथं चर्चा करणे गरजेचे आहे. एकूण सीमेवरील संपूर्ण स्थिती पाहता आपला पाया मजबूत आहे आणि आपण आपल्या सर्व उद्देशांत यशस्वी होऊ, असेही ते म्हणाले.