नवी दिल्ली - जगात कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही. यातच आता तिसऱ्या लाट पसरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाच्या 'डेल्टा प्लस' व्हॅरिएंटबद्दल सावधगिरी बाळगण्याचा इशारा अनेक राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
डेल्टा प्लस हा व्हॅरिएंट जगातील 9 देशांमध्ये आहे. आतापर्यंत भारतात डेल्टा प्लस व्हॅरिएंटचे 22 रुग्ण आढळले आहेत. यापैकी जास्तीत जास्त 16 महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव येथील आहेत. या व्यतिरिक्त केरळच्या पलक्कड आणि पठाणमथिट्टा जिल्ह्यात आणि मध्य प्रदेशातील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यात डेल्टा प्लसव्हॅरिएंटचे प्रकार समोर आले आहेत.
तीन राज्यांना सतर्कतेचा इशारा -
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक कन्सोर्टियाच्या नुकत्याच झालेल्या निष्कर्षांच्या आधारे महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश यांना या व्हॅरिएंटबाबत सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.