महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीला गमवावा लागला हाताचा तळवा; 20 वर्षानंतर 16 लाखांची भरपाई देण्याचे तेलंगाणा ग्राहक आयोगाचे आदेश - तेलंगाणा ग्राहक आयोगाचे आदेश

2003 मध्ये अमृता नर्सिंग होममधील हनुमाकोंडा ( Amrita Nursing in Home Hanumakonda )येथे ताप बरा करण्यासाठी चार वर्षांची चिमुरडी सौम्या ( child sowmya lost palm ) हॉस्पिटलमध्ये गेली होती. सलाईन देण्यासाठी इंजेक्शन पाईप चुकीच्या ( improper installation of injection pipe  ) पद्धतीने बसवल्यामुळे सौम्या अपंग झाली होती. रुग्णालयातील डॉ. जी. रमेश यांनी तिच्यावर उपचार केले. मुलीच्या पालकांनी वरंगल एमजीएम ( Warangal MGM Hospital ) रुग्णालयात मुलीला दाखल केले. डॉक्टरांना मुलीचा हाताचा तळवा काढून टाकावा लागला.

मुलीला गमवावा लागला हाताचा तळवा
मुलीला गमवावा लागला हाताचा तळवा

By

Published : May 17, 2022, 4:48 PM IST

हैदराबाद- तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील हनुमाकोंडा येथे डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने ( negligence of a doctor At Hanumakonda ) एका मुलीला हाताचा तळवा गमवावा ( child lost the palm ) लागला. तिचे आई-वडील 20 वर्षांपासून संघर्ष करूनही त्यांना न्याय मिळाला नव्हता. अखेर राज्य ग्राहक आयोगाने ( State Consumer Commission ) पीडितेला एकूण 16 लाख रुपये 7 टक्के व्याजासह पुरेशी भरपाई देण्याचे डॉक्टर व विमा कंपनीला आदेश दिले आहेत.

2003 मध्ये अमृता नर्सिंग होममधील हनुमाकोंडा ( Amrita Nursing in Home Hanumakonda )येथे ताप बरा करण्यासाठी चार वर्षांची चिमुरडी सौम्या ( child sowmya lost palm ) हॉस्पिटलमध्ये गेली होती. सलाईन देण्यासाठी इंजेक्शन पाईप चुकीच्या ( improper installation of injection pipe ) पद्धतीने बसवल्यामुळे सौम्या अपंग झाली होती. रुग्णालयातील डॉ. जी. रमेश यांनी तिच्यावर उपचार केले. दोन दिवसांनी डिस्चार्ज दिला. त्यानंतर सलाईन टोचून उजव्या हाताला सूज आली होती. मुलीच्या पालकांनी पुन्हा डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी हैदराबादमधील दुसऱ्या खासगी डॉक्टरकडे जाण्याची शिफारस केली. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नव्हते. मुलीच्या पालकांनी वरंगल एमजीएम ( Warangal MGM Hospital ) रुग्णालयात मुलीला दाखल केले. डॉक्टरांना मुलीचा हाताचा तळवा काढून टाकावा लागला.

16 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश -सौम्याचे वडील रमेशबाबू यांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपली मुलगी अपंग झाल्याचा आरोप करत जिल्हा ग्राहक मंचाकडे धाव घेतली. जिल्हा न्यायालयाने 2016 मध्ये डॉक्टर आणि युनायटेड इन्शुरन्स कंपनीने पीडितेच्या कुटुंबाला संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे 16 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. याला आव्हान देत डॉ. जी. रमेश आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी राज्य ग्राहक आयोगाकडे स्वतंत्र अपील दाखल केले.

जिल्हा मंचाने फेटाळले अपील-न्यायमूर्ती जैशवाल, ग्राहक आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य मीनारामनाथन आणि के रंगाराव यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. पीडित कुटुंबातर्फे वकील व्ही गौरीशंकर राव यांनी बाजू मांडली. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधिकरणाने सलाईन लावण्यासाठी लावलेल्या पाईपच्या बाबतीत डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचे निष्कर्ष काढले. जिल्हा मंचाने डॉक्टर व विमा कंपनीचे अपील फेटाळले.

दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे १९ वर्षांपूर्वी सौम्याचा हात गमावूनही नुकसानभरपाई न मिळाल्याने सौम्याच्या कुटुंबाने आश्चर्य व्यक्त केले आहे.

हेही वाचा-LIC Share Listing : एलआयसीचे शेअर्स BSE आणि NSE वर सूचिबद्ध.. पहिल्याच दिवशी मिळाली 'इतकी' किंमत..

हेही वाचा-Gyanvapi Mosque row : न्यायालयात अहवाल सादर करण्याकरिता 2 दिवसांची मुदत द्या- न्यायालय आयुक्तांची न्यायालयात मागणी

हेही वाचा-Inflation hit a record high : धान्य, इंधनाच्या किमती वाढल्यामुळे महागाई 15.08% च्या विक्रमी उच्चांकावर

ABOUT THE AUTHOR

...view details