नवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. (Shraddha Murder Case). त्याने आता कारागृह प्रशासनाकडे कादंबरी आणि साहित्याची पुस्तके वाचण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तिहार तुरुंगातील सूत्रांनी माहिती दिली आहे की, आफताबला इंग्रजी पुस्तके वाचायची आहेत. तिहार तुरुंग प्रशासनानेही त्याला लवकरात लवकर ही पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. (Aftab asked for literature books in Tihar jail).
Shraddha Murder Case : आफताबला तुरुंगात हवी इंग्लिश पुस्तके, प्रशासनाचे लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन - आफताबला तुरुंगात हवी इंग्लिश पुस्तके
न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकल्याची कबुली दिली आहे. (Shraddha Murder Case). त्याचे इतर अनेक मुलींशीही संबंध असल्याचे त्याने कबूल केले होते. (Aftab confesses to killing Shraddha).
आफताबची नार्को चाचणी : आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीच्या पाच फेऱ्या आणि दोन तासांची नार्को चाचणी झाली. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकल्याची कबुली दिली आहे. त्याचे इतर अनेक मुलींशीही संबंध असल्याचे त्याने कबूल केले होते. या आधी गुरुवारी आंबेडकर रुग्णालयात सुमारे दोन तास आरोपी आफताबची नार्को चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये आफताबने अत्यंत मोजूनमापून उत्तरे दिली. अनेक उत्तरे तो लपवतही होता. मात्र, सतत विचारपूस केल्यानंतर त्याने सर्व बाबी सांगितल्या. नार्को चाचणीनंतर शुक्रवारी त्याच्या नार्को चाचणीनंतरचे सत्रही पार पडले. या चाचणीतून तपास अधिकाऱ्यांना बरीच माहिती मिळाली आहे.
तुरुंग अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, आफताबच्या सुरक्षेचा विचार करून तुरुंग अधिकाऱ्यांनी ही व्यवस्था केली होती. कारण, सोमवारी काही लोकांनी आफताबच्या गाडीवर तलवारीने हल्ला केला होता. त्यामुळे त्याला कारागृहातून प्रयोगशाळेत नेणे धोक्याचे बनले होते.