कोझिकोड(केरळ) : African Swine Fever Confirmed : प्राण्यांसाठी धोकादायक आफ्रिकन स्वाइन फिव्हर या आजाराचं प्रकरण केरळमध्ये समोर आलं आहे. कोझिकोड जिल्ह्यात एक वराह (रानडुकर) मृतावस्थेत आढळल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर भोपाळच्या व्हायरोलॉजी लॅबनं केलेल्या तपासणीनंतर हा आफ्रिकन स्वाइन फिव्हरचा विषाणू असल्याची पुष्टी झाली. त्यामुळं केरळमधील पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
स्वाइन फिव्हरचा संसर्ग : कोझिकोड जिल्ह्यातील मारुथोंकारा येथे एक रानडुकर मृतावस्थेत आढळून आलं. या भागात नुकतीच निपाहची पुष्टी झाली होती. आता इथं आफ्रिकन स्वाइन फिव्हरचा संसर्ग आढळून आलाय. कोझिकोड जिल्ह्यात प्रथमच आफ्रिकन स्वाइन फिव्हर आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. हा विषाणूचा थेट मानवावर कोणताही परिणाम होत नाहीय. या विषाणूची पुष्टी झाल्यानंतर एक किलोमीटरच्या परिघात डुकरांना मारलं जातं आहे.
वराहांना विषाणूची लागण : पुष्टी झालेल्या भागात सध्या वराह पालनाचे फार्म नाहीत. केरळच्या आरोग्य विभागानं सांगितले की, जनजागृतीबाबत जवळपासच्या शेतमालकांना माहिती दिली जाईल. 6 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व वराह फार्म मालकांना जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या सभागृहात बोलावून सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. पाळीव वराहांना या विषाणूची लागण झाली, तर त्यांचे मृत्यू होणे सामान्य बाब आहे. हा आजार केनियामध्ये 1907 मध्ये पहिल्यांदा आढळला होता. आफ्रिकन वराहचं संक्रमण ब्रिटीश वसाहतींमध्ये पाळीव वराहामध्ये आढळून आलंय.
असा पसरला आजार :हा रोग पाच दशकं आफ्रिकन खंडापुरता मर्यादित होता. त्यानंतर 1957 मध्ये तो युरोपमध्ये पसरला. पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे 1957 मध्ये आफ्रिकेतून आयात केलेल्या वराहाच्या मांसातून हा आजार पहिल्यांदा दिसून आला. त्यानंतर हा रोग स्पेन, फ्रान्स, इटली, माल्टामध्ये पसरला. त्यानंतर आफ्रिकन स्वाइन फिव्हर अमेरिकेत आला. 1978 मध्ये जेव्हा युरोपियन देश माल्टामध्ये हा रोग पसरला, तेव्हा हा रोग नष्ट करण्यासाठी संपूर्ण देशातील वराहांना मारण्यात आलं. 1960, 1990 च्या दशकात, आफ्रिकन रोगामुळं युरोपमधील वराह फार्म उद्योगाचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं.
हेही वाचा -
- Foods For Sinus Relief : सायनसच्या संसर्गापासून आराम मिळवायचाय? आहारात करा आरोग्यदायी पदार्थांचा समावेश...
- Tulsi Oil Benefits : केसांच्या समस्येपासून हैराण आहात? वापरून पाहा तुळशीचं तेल...
- Benefits of steam : वाफ घेतल्यानं मिळते चेहऱ्याच्या अनेक समस्यांपासून सुटका; जाणून घ्या फायदे