महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तालिबानींकडून हत्या नव्हे मारहाण- अफगाणिस्तानच्या पत्रकाराचा खुलासा - तालिबानी पत्रकार मारहाण

तालिबानी हे शस्त्र घेऊन लँड क्रुझरने आले होते. त्यांनी बंदुकीच्या धाकाने मारहाण केल्याचे पत्रकार झियार याद खान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पत्रकार झियार याद खान
पत्रकार झियार याद खान

By

Published : Aug 26, 2021, 3:19 PM IST

हैदराबाद -अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केलेल्या तालिबान्यांच्या जुलुमी राजवटीचे रोज नवीन प्रकार समोर येत आहेत. अशातच एका माध्यमाचे पत्रकार झियार याद खान यांची तालिबानींनी हत्या केल्याचे काही माध्यमांनी म्हटले होते. त्यावर हत्या नव्हे तालिबानींकडून बंदुकीच्या धाकाने मारहाण झाल्याचा खुलासा खान यांनी केला.

पत्रकार झियार याद खान घडलेल्या घटनेची ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की काबुलमधील न्यू सिटीमध्ये वार्तांकन करताना तालिबानींनी मला मारहाण केली. कॅमेरा, तांत्रिक उपकरणे आणि माझा वैयक्तिक मोबाईलदेखील हिसकावून घेतला. काही लोकांनी माझ्या मृत्युची पसरवलेली बातमी चुकीची आहे. तालिबानी हे शस्त्र घेऊन लँड क्रुझरने आले होते. त्यांनी बंदुकीच्या धाकाने मारहाण केल्याचे पत्रकार खान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. झियार याद खान हे अफगाणिस्तानमधील टोलो न्यूज या अफगाणिस्तानमधील एकमेव स्वतंत्र वृत्तवाहिनीचे पत्रकार आहेत.

पत्रकार झियार याद खान यांचे ट्विट

हेही वाचा-ओडिशात वयोवृद्ध व्यक्तीने पत्नीच्या चितेवर उडी घेत जीवनयात्रा संपवली

तालिबानींनी दानिश सिद्दिकी यांची 16 जुलैला केली होती हत्या

दानिश सिद्दिकी या भारतीय पत्रकाराचा वृत्ताकंन करत असताना अफगाणिस्तानात 16 जुलैला मृत्यू झाला आहे. दानिश सिद्दिकी हे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्ससाठी काम करत होते. सिद्दीकींचा मृत्यू कंधार प्रांतातील स्पिन बोल्डक भागात झाला आहे. दानिश सिद्दिकी हे कंधारमधील परिस्थितीचे वृत्तांकन करत होते. भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंडझे यांनी सिद्दीकीच्या मृत्यूविषयीचे ट्विट केले होते.

हेही वाचा-काय आहे म्हैसूर सामूहिक बलात्कार प्रकरण, मुंबईच्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

तालिबानींची अफगाणिस्तानात सत्ता-

तालिबानींनी 15 ऑगस्टला अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर ताबा मिळविला आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी देशातून पळ काढला आहे. अमेरिकेने 20 वर्षानंतर अफगाणिस्तानमधून सैन्य काढण्याचे जाहीर केल्यानंतर तालिबानींनी संपूर्ण देशावर सत्ता स्थापन केली आहे.

हेही वाचा-TMC MP अभिनेत्री नुसरत जहांला पुत्ररत्न; पती निखिल जैन म्हणाले होते, हे बाळ माझे नाही

ABOUT THE AUTHOR

...view details