नवी दिल्ली :अफगाणिस्तान दूतावासानं नवी दिल्लीतलं आपलं कामकाज कायमचं बंद करण्याची घोषणा केली आहे. भारत सरकारकडून पाठिंबा न मिळाल्यामुळे आणि 'अफगाणिस्तानमध्ये कायदेशीर कामकाजाचं सरकार' नसल्याचं सांगून या वर्षी 30 सप्टेंबरला त्यांचं कामकाज बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आलाय. एक्स सोशल मीडियावर पूर्वीचे ट्विटर, अफगाण दूतावासानं म्हटलंय की, "भारत सरकारच्या धोरणांमुळे 23 नोव्हेंबर 23 पासून दुतावासातील कामकाज बंद आहे. भारत सरकारकडून काही सकारात्मक पावलं उचलली जातील असं वाटत होतं. मात्र तसं काही दिसत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अजूनही आशा आहे की भारत सरकारची भूमिका अनुकूलपणे बदलेल.
कामकाज कायमस्वरूपी बंद -यासंदर्भात अफगाणी अधिकार्यांच्या निवेदनात म्हटलंय की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तानच्या दूतावासानं नवी दिल्लीतील कामकाज कायमस्वरूपी बंद करण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी नवी दिल्लीतील इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तानच्या दूतावासानं आपलं राजनैतिक मिशन कायमचं बंद केल्याची घोषणा केल्याबद्दल खेद वाटतो, असंही या निवेदनात म्हटलं आहे. या कामकाज बंद करण्याला कदाचित अंतर्गत संघर्षाचा कारण काहीजण देऊ शकतात. मात्र हा निर्णय धोरण आणि हितसंबंधांमधील व्यापक बदलांचा परिणाम आहे, असंही या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचवेळी आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आभारही मानण्यात आले आहेत.
अफगाण समुदायामध्ये लक्षणीय घट -अफगाण दूतावासाने अनेक असुविधा असूनही तसंच काबूलमध्ये कायदेशीर सरकार नसतानाही अथक प्रयत्न करुन दुतावास सुरू होता. गेल्या दोन वर्षे तीन महिन्यांत, अफगाण निर्वासित, विद्यार्थी आणि व्यापारी देश सोडून जात आहेत. भारतातील अफगाण समुदायामध्ये लक्षणीय घट झाली आहे. दूतावासाने आपल्या निवेदनात नमूद केलय की, ऑगस्ट 2021 पासून ही संख्या जवळपास निम्मी झाली आहे. या कालावधीत अत्यंत मर्यादित नवीन व्हिसा जारी केले जात आहेत.
मानवतावादी मदत -आम्ही अफगाण समुदायाला खात्री देतो की भारतासोबतचे ऐतिहासिक संबंध आणि द्विपक्षीय संबंध लक्षात घेऊन हे कामकाज सुरू होतं. पारदर्शकता, जबाबदारी आणि अफगाणिस्तानच्या सद्भावना तसंच हितसंबंधांवर आधारित कामकाज करण्यात आलं. दुर्दैवाने, तालिबान-नियुक्त आणि संलग्न मुत्सद्दींनी आमची प्रतिमा मलिन करण्याचं आणि राजनैतिक प्रयत्नांना अडथळा आणण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. या आव्हानांचा सामना करताना, अत्यंत कठीण परिस्थितीत 40 दशलक्ष अफगाण लोकांच्या हितसंबंधांना मानवतावादी मदत आणि ऑनलाइन शिक्षण शिष्यवृत्ती मिळवून देण्यापासून व्यापारात सुलभता आणण्यापर्यंत सर्व संभाव्य क्षेत्रात प्राधान्य देऊन दुतावासानं काम केलं, दूतावासानं आपल्या निवेदनात पुढं म्हटलं आहे.
हेही वाचा
- भारत सरकारचा मोठा निर्णय, कॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा केली पूर्ववत
- इस्रायल हमासमध्ये तात्पुरती युद्धबंदी; इस्रायलच्या मंत्रिमंडळानं दिली मंजुरी, इराणची इस्रायलवर टीका
- इस्रायल-हमास यांच्यात युद्धविराम, पहिल्या तुकडीत 13 ओलिसांची होणार सुटका